Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : शिरपूर, शहादा तालुक्यांत पिकांचे नुकसान

Unseasonal Rain : धुळ्यातील शिरपूर व नंदुरबारातील शहादा परिसरात मागील आठवड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला होता.

Team Agrowon

Nandurbar News : धुळ्यातील शिरपूर व नंदुरबारातील शहादा परिसरात मागील आठवड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला होता. शहादा व शिरपूर तालुक्यात अवकाळीने पपई आणि केळी पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, भरपाई लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

शिरपूर येथील बाजार समितीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर शेतीमालाची आवक सुरू आहे. त्यामुळे वाहनांची संख्याही वाढली आहे. शेतीमाल शेडमध्ये ठेवण्यासाठी वाहने रांगेत उभी असतानाच पाऊस सुरू झाल्याने नुकसान झाले होते.

यापूर्वी १ मार्चला शिरपूर तालुक्यात तुफानासह पाऊस झाला होता. त्यात केळी, पपईच्या फळबागा, गहू, बाजरी, मका आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. दरम्यान, उकडा व ढगाळ वातावरण कायम असल्यामुळे पाऊस पुन्हा येईल की काय, भीती आहे.

वादळी वाऱ्यासह पावसामुळे केळीचे मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास गेला. अस्मानी संकटामुळे तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत.
युवराज पाटील, शेतकरी, फेस (ता. शहादा, जि. नंदुरबार)

वीजपुरवठा सुरळीत

शहाद्यातील फेस येथे जिल्हा परिषद शाळेच्या छताचे पत्रे उडाले. बामखेडा परिसरात केळीचे नुकसान झाले, तर वीजखांबासह ट्रान्स्फॉर्मर पडला होता. अनेक वृक्ष उन्मळून पडले. सर्वाधिक नुकसान फेस व बामखेडा परिसरात झाले होते.

या परिसरात वीजपुरवठा खंडित झाला. नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक कोलमडले आहेत. परंतु वीजपुरवठा आता सुरळीत झाला आहे. परंतु पपई, केळी व अन्य पिके हातची गेली असून, वित्तीय समस्या वाढल्या आहेत. मोठा खर्च, पपई, केळी पिकासाठी शेतकऱ्यांनी केला होता. हा खर्च वाया गेला असून, अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

GDP growth India 2026 : २०२६ मध्ये भारताची अर्थव्यवस्था ६.४ टक्क्यांनी वाढेल; संयुक्त राष्ट्र संघाचा अंदाज

Illegal Fertilizer Stock: हरसूल येथे विनापरवाना खत साठ्यावर कृषी विभागाचा छापा

Agriculture Electricity Issues: शेतीची वीज बंद केल्यास याद राखा : सावकार मादनाईक

Fertilizer Availability: खते उपलब्ध, अफवांना बळी पडू नका : विवेक कुंभार

Agrowon Podcast: कांद्याला भाव कमीच; कापसाला मागणी, सोयाबीन टिकून, जिरा भाव नरमला तर खरबुजाची आवक वाढली

SCROLL FOR NEXT