Farmer Compensation Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांतील नुकसान भरपाईसाठी हवेत १ कोटी ४० लाख

Marathwada Crop Damage : हिंगोली जिल्ह्यातील १४ हेक्टर, नांदेड जिल्ह्यातील ५२.६८ हेक्टर, तर ३६५.६६ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचा समावेश आहे.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील लातूर, नांदेड व हिंगोली या तीन जिल्ह्यांत मार्च व एप्रिल २०२५ मध्ये झालेल्या शेतीपिकाच्या नुकसान भरपाईकरिता १ कोटी ४० लाख ५१ हजार ५८० रुपयांचा निधी अपेक्षित असल्याचे महसूल प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

या संदर्भात अधिक माहितीनुसार मार्च महिन्यात अतिवृष्टी व पूर स्थितीमुळे लातूर जिल्ह्यातील ८४ शेतकऱ्यांच्या शेतिपिकाचे ३३.१० हेक्टरवर ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले होते. या नुकसानीमध्ये सर्व फळपिकांच्या नुकसानीचा समावेश होता. त्याकरिता ३६००० प्रतिहेक्टर प्रमाणे ११ लाख ९१ हजार ६०० रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे.

याशिवाय एप्रिल २०२५ मध्ये हिंगोली, नांदेड व लातूर जिल्ह्यांतील १०६७ शेतकऱ्यांचे ४३२.३४ हेक्टरवरील शेतीपिकाचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले. त्यामध्यें १०१.४० हेक्टर जिरायती, ४८.१० हेक्टर बागायत, तर २८२.८४ हेक्टर फळपिकांच्या नुकसानीचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यातील १४ हेक्टर, नांदेड जिल्ह्यातील ५२.६८ हेक्टर, तर ३६५.६६ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचा समावेश आहे.

जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी हेक्टरी १३६०० प्रमाणे १३ लाख ७९ हजार ४० रुपये, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी २७ हजार रुपये प्रमाणे १२ लाख ९८ हजार ७०० रुपये तर फळ पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी ३६ हजार रुपये प्रमाणे एक कोटी एक लाख ८२ हजार २४० रुपये असे एकूण १ कोटी २८ लाख ५९ हजार ९८० रुपयांची आवश्यकता आहे.

नुकसानीसाठी आवश्यक असलेल्या निधीत हिंगोली जिल्ह्याकरिता ५ लाख ४ हजार रुपये नांदेड जिल्हा प्रताप १६ लाख १० हजार ३८० रुपये तर लातूर जिल्ह्याकरिता १ कोटी ७ लाख ४५ हजार ६०० रुपये निधीची आवश्यकता असल्याचे महसूल प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

Farmer Loan Waiver: वनपट्टाधारक, वारसांना मिळणार कर्जमाफी

Potato Crop Damage: पावसाअभावी बटाटा पीक करपले; पंचनाम्यांची मागणी

Ganesh Festival: गणरायाचे उत्साहात आगमन

Silk Farming: ‘सॉइल टू सिल्क’मधून मूल्यसाखळी उभारणी

SCROLL FOR NEXT