Wild Boar Agrowon
ॲग्रो विशेष

Wild Animal Rampage : रब्बी पिके वन्यप्राण्यांच्या कचाट्यात

शेतकऱ्यांच्या खरिपासह रब्बी पिकावर येणारी संकटाची मालिका कायम आहे. यंदा अतिवृष्टीने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले.

Team Agrowon

Crop Damage News Latur : तालुक्यात काही प्रमाणात शेतकऱ्यांनी विविध रब्बी पिके मोठ्या कष्टांनी घेतली. परंतु वन्यप्राण्यांच्या (Wildlife Animal Rampage) कचाट्यात ही पिके असून त्यांना शेताबाहेर हुसकावून लावता लावता नाकीनऊ येत असल्याने शेतकरी त्रस्त असल्याचे चित्र आहे.

शेतकऱ्यांच्या खरिपासह रब्बी पिकावर (Rabi Season) येणारी संकटाची मालिका कायम आहे. यंदा अतिवृष्टीने खरीप पिकांचे मोठे नुकसान (Crop Damage) झाले. विमा कंपनीने (Insurance Company) पाठ फिरवली, त्यामुळे शेतकऱ्यांची आशा रब्बीवर होती.

मात्र, आता हाती आलेल्या पिकांवर वन्य प्राण्यांचे कळप ताव मारत असून पिकांची मोठी नासाडी करीत आहेत. परिणामी, शेतकरी त्रस्त झाले आहेत. यंदा जलसाठे समाधानकारक पाहून त्या भरवशावर शेतकऱ्यांनी रब्बी पेरणी केली.

मोठ्या मेहनतीने पीक वाढवले. पण, हरभरा, गहू, ज्वारी हे पिके वन्य प्राणी उद्ध्वस्त करीत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. यात रानडुक्कर, हरिण, माकड, सायाळ आदीचा समावेश आहे.

रात्रीच्या वेळी हरिण, काळवीट, रानडुक्कर, आदी प्राणी शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाची नासाडी करीत आहेत. कणसाचे दाणे पक्षी टिपत आहेत. त्यामुळे उत्पन्न घटणार हे स्पष्ट आहे. पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी कडाक्याच्या थंडीत रात्र जागून काढत आहेत.

सध्या वन्यप्राण्यांना जंगलात खाद्य नसल्याने बहरलेल्या शेताकडे मोर्चा वळवत आहेत. वन्यप्राण्यांनी पिकांची नासाडी केल्यावर किमान २५ हजार रुपयांपेक्षा अधिक नुकसानभरपाई द्यावी आणि वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

नुकसान टाळण्यासाठी शेतकरी पाळीव कुत्र्यांचे आवाज रेकॉर्ड करून मोठ्या आवाजात भोंगे रात्री ते शेतात लावत आहेत. याशिवाय रात्री तासातासाला मोठ्या आवाजाचे फटाके फोडण्याचे कामही शेतकरी करीत आहेत.

काही भागात सायाळ प्राण्यांचे वास्तव्य...

काही भागात जलसाठ्याजवळ अलीकडे सायाळ प्राण्यांचे वास्तव्य असल्याचे शेतकरी सांगत आहेत. कोणी त्याला अडवण्यासाठी गेल्यास तो काटेरी पिसारा फुलवून प्रतिहल्ला करतो.

कुत्राही त्याला घाबरतो असे शेतकरी सांगत आहेत. हा प्राणी नविन असल्याने अनेकजण त्याला घाबरत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Cycle Process: जलशास्त्र : पाण्याच्या प्रवासाचे विज्ञान

Soil Health Management: जमीन सुपोषण ही काळाची गरज : डॉ. इंद्र मणी

Farming Tips: कोरडवाहू शेतात दीर्घकाळ ओलावा टिकवण्यासाठी विविध पद्धती

Youth Congress Protest: मुदखेडमध्ये युवक काँग्रेसचा गाढव मोर्चा

Farm Loan Waiver: ३२ लाख शेतकऱ्यांची फसवणूक, त्यांची ५० हजारांवर बोळवणूक, कर्जमाफीवरून अजित नवलेंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT