Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : मराठवाड्यातील पिकांना पाऊस, गारपिटीचा दणका

Hailstorm : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत अवकाळी पाऊस व गारपिटीने फळबागा व रब्बी पिकांना चांगलाच दणका दिला आहे.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Chhatarpati Sambhajinagar News : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत अवकाळी पाऊस व गारपिटीने फळबागा व रब्बी पिकांना चांगलाच दणका दिला आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान वाढले आहे. यंत्रणांकडून प्राथमिक अंदाज घेण्याचे काम सुरू आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड, धाराशिवमधील उमरगा व परांडा, लातूर जिल्ह्यातील जळकोट, लातूर आदी ठिकाणी नुकसानीचे प्राथमिक अंदाज आले. इतर ठिकाणच्या नुकसानीचे प्राथमिक अंदाज घेण्याचे काम शुक्रवारी (ता. १२) यंत्रणेकडून सुरू होते.

सिल्लोड तालुक्यात गुरुवारी गारपीट झाली. सर्वत्र गारांचा खच पडला होता. गारपिटीने मिरची पिकाला मोठा फटका बसला. शुक्रवारी सकाळपासूनच महसूल व कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पीक पाहणी सुरू केली. रहिमाबाद येथे मिरची पिकाच्या ३५ शेडनेटचे नुकसान झाले आहे.

तालुक्यात २९२ शेतकऱ्यांच्या १३६ हेक्टर बागायत व २७ हेक्टर फळबागांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. धाराशीव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात ३०८ हेक्टर तर परांडा तालुक्यात १०.३० हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे.

उमरगा तालुक्यात कुणाळी गावातील पान मळ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नारंगवाडी मंडळात तब्बल ६६ मिलिमीटर तर मूळज मंडळात ५० मिलिमीटर पाऊस झाला. २१० हेक्टर जिरायत, तर ५० हेक्टरवरील आंबा व इतर फळ पिकांचे नुकसान झाले. परांडा तालुक्यात आंब्याला फटका बसला.

बीड जिल्ह्यात नुकसानीचा प्राथमिक अंदाज घेण्याचे काम सुरू आहे. धारूर, परळी, अंबाजोगाई आणि वडवणी या तालुक्याचा अहवाल अप्राप्त होता. लातूर जिल्ह्यात जळकोट तालुक्यासह लातूर व इतर तालुक्यांत तीन ते चार हेक्टरपर्यंत आंबा बागांचे नुकसान झाले. जालना जिल्ह्यात मात्र नुकसान झाल्याची माहिती मिळू शकली नाही.

दरम्यान, शुक्रवारी दुपारनंतर पैठण शहर परिसर, तालुक्यातील लोहगाव परिसर, गंगापूर तालुक्यातील कायगाव तसेच घाटनांद्रा परिसर, जालना जिल्ह्यातील अंकुश नगर, वडीगोद्रीत पाऊस झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT