Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सव्वातीन कोटींची मदत

Heavy Rain Crop Damage : दि २८ डिसेंबर २०२३ रोजी तालुक्यातील बेट भागासह पश्चिम भागात प्रचड वादळ वाऱ्यासह गारपिट झाली होती

Team Agrowon

Pune News : शिरूर तालुक्यातील बेटभागासह पश्चिम पट्यातील १४ गावात वादळवाऱ्या सह झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात त्यांचे नुकसान भरपाई होते ,त्यांचे नुकसान भरपाईपोटी ३ कोटी २२ लक्ष रुपयाची मदत शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग करण्यात येत असुन सर्वांने खाते केवायसी करून घ्यावे असे आवाहन तहशिलदार बाळासाहेब म्हस्के यांनी केले आहे .

दि २८ डिसेंबर २०२३ रोजी तालुक्यातील बेट भागासह पश्चिम भागात प्रचड वादळ वाऱ्यासह गारपिट झाली होती . गारीपटीची तिव्रता खुप असल्यांने भाजीपाला पिकासह फळझाडे पिकाचेही अतोनात नुकसान झाले . हातातोंडाशी आलेला घास गेल्यांने शेतकरी वर्ग हतबल झाला होता .

या मधे टाकळी हाजी, साबळेवाडी, माळवाडी, कवठे येमाई, मुंजाळवाडी, खैरेनगर, सविंदणे ,पाबळ , केंदुर, फाकटे, काठापुर , इचकेवाडी ,कान्हुर मेसाई ,वाघाळे या परीसरातील शेतकऱ्यांच्या भाजीपाला व फळझाडाचे मोठ्या प्रमानात नुकसान झाले होते .

यावेळी लोकप्रतिनिधी व शेतकरी यांनी मागणी करून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती त्यानुसार प्रांत अधिकारी हरीष सुळ ,तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी तातडीने आदेश देत कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली या भागातील पिकाचे प्रत्यक्ष पंचनामे केले.

त्यामध्ये दोन हजार सातशे सात शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात आले होते . याबाबत तहशिलदार बाळासाहेब म्हस्के म्हणाले की पंचनाम्यानुसार नुकसान झालेल्या दोन हजार ७०७ शेतकऱ्यांना तीन कोटी २२ लाख विस हजार रुपयांची मदत मंजुर झाली असुन प्रत्येकांच्या खात्यात वर्ग होत आहे .

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Warehouse Receipt: पूर्व युरोप, मध्य आशिया खंडातील गोदाम पावती वित्तपुरवठा

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Sulabh Seva Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

SCROLL FOR NEXT