Sugarcane Worker Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Worker : ‘फसवणूक करणाऱ्या मुकादमांवर गुन्हे नोंदवू’

Sugarcane Harvesting : अप्पर पोलिस अधिक्षक आनंद भोईटे ः ऊस वाहतूकदारांशी संवाद

Team Agrowon

Sugar Mill : सोमेश्वरनगर ः ‘‘ऊसतोडणी मजूर व मुकादमांकडून फसवणूक झालेल्या वाहतूकदारांनी एकत्रितरीत्या तक्रारी पोलिसांकडे दाखल कराव्यात. पुरावे तपासून रीतसर गुन्हे दाखल करण्याची आणि संबंधित फसवणूक करणारांना समन्स पाठविण्याची जबाबदारी पोलिस घेतील. वाहतूकदारांनी एकटे वसुलीसाठी जाऊन धोका पत्करू नये,’’ असे आवाहन अप्पर पोलिस अधिक्षक आनंद भोईटे यांनी केले.

येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर ऊसतोडणी वाहतूकदार, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी यांच्यासोबत संवाद कार्यक्रम झाला. फसवणूक झालेल्या वाहतूकदारांनी भोईटे यांच्यासमोर गाऱ्हाणे मांडले. कुणी मुकादमांनी फसवणूक केल्याचे सांगितले तर कुणी थेट ऊसतोड मजुरांनीच गंडा घातल्याची माहिती दिली.

कोट्यवधी रुपयांना चुना लागल्याने जगणे अवघड झाल्याच्या तसेच कर्जबाजारी झाल्याच्याही तक्रारी काही वाहतूकदारांनी केल्या. यामुळे हे प्रकरण भोईटे यांनी गांभीर्याने घेतले आणि कायदेशीर मार्गाने यातून काय करता येईल याबाबत वाहतूकदारांशी चर्चा केली.

वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे, फौजदार पांडुरंग कान्हेरे, पुरुषोत्तम जगताप आदी उपस्थित होते.

आनंद भोईटे म्हणाले...

 पुरावे सादर केल्यास फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे शक्य

 धनादेश न वटल्याचा पुरावा ग्राह्य धरता येईल

सोमेश्वर कारखाना कार्यक्षेत्रातील वाहतूकदारांनी जेजुरी, वडगाव निंबाळकर या पोलिस ठाण्यात तक्रारी एकत्रित दाखल कराव्यात

 काही प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्तीला बोलावून तडजोडीचा प्रयत्न पोलिस करणार

 एकेकटे वसुलीसाठी जाऊन धोका पत्करू नये

 पोलिस समन्स बजावणार

 पोलिसांच्या पातळीवर विशेष समितीही स्थापन करणार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT