Mahabeej Theft Agrowon
ॲग्रो विशेष

Mahabeej Theft : ‘महाबीज’च्या गोदामातील सोयाबीन बियाणे चोरीप्रकरणी गुन्हा

Mahabeej Seeds Theft : ‘महाबीज’च्या (महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ) परभणी येथील बीज प्रक्रिया केंद्रातील गोदामातून सोयाबीन बियाणे चोरी केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Team Agrowon

Parbhani News : ‘महाबीज’च्या (महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ) परभणी येथील बीज प्रक्रिया केंद्रातील गोदामातून सोयाबीन बियाणे चोरी केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाबीज बीजप्रक्रिया केंद्रातील वरिष्ठ अभियंत्यांनी गोदामातील सोयाबीन बियाणे लॉटची थप्पी काढत असताना काही लॉटमधील पोत्यांची संख्या कमी आढळून आली. काही पोती चोरीस गेल्याचा संशय आला. बीजप्रक्रिया केंद्र परिसर व गोदामातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता ता. २९ नोव्हेंबर २०२२ रोजी व ता. ३० नोव्हेंबर २०२२ रोजी पहाटे अडीच ते साडेचारच्या दरम्यान सीसीटीव्ही कॅमेरे बंद केल्याचे आढळून आले.

सर्व गोदामातील बियाणे पोत्यांची बारकाईने पाहणी केली असता एकूण ४ लाख ५५ हजार ५२३ रुपये किमतीचे सोयाबीनच्या कच्च्या बियाण्यांची ११९ पोती, त्यांचे एकूण वजन ६६.२२ क्विटंल असलेला मुद्देमाल चोरीस केल्याचे आढळून आले.

सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर गोदामाचे सुरक्षा रक्षक, कनिष्ठ यंत्रचालक व खासगी मालवाहनचालक यांनी संगमनत करून बियाण्याची चोरी केल्याचे विभागीय कार्यालयाद्वारे करण्यात आलेल्या चौकशी दरम्यान निष्पन्न झाले.

याप्रकरणी महाबीजच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार केंद्र अभियंता विनायक जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून नितीन बहुरे, हेमंत शिनगारे, रवी बहुरे यांच्या विरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Temperature Rise: खानदेशात उष्णता वाढू लागली; शेतीकामांच्या वेळेत होतोय बदल

Weather Update: राज्यात ऊन, उकाडा वाढला; बहुतांशी भागांत किमान आणि कमाल तापमानात वाढ

Girna Dam: गिरणा धरणातून दुसरे आवर्तन

IAS Varsha Meena: प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न करा : जिल्हाधिकारी वर्षा मीना

Medicinal Plants: औषधी वनस्पतींमुळे उत्पन्न वाढणार

SCROLL FOR NEXT