Drip Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Irrigation Scam : सूक्ष्म सिंचन घोटाळ्यात अधिकाऱ्यांविरुद्धही गुन्हा

Agriculture Irrigation : या प्रकरणात बऱ्याच काळानंतर आता तालुका कृषी अधिकारी व अन्य एका कृषी अधिकाऱ्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

 गोपाल हागे

Buldana News : तालुक्यात सूक्ष्म सिंचन साहित्य वितरणात गेल्या काळात कोट्यवधी रुपयांचा घोळ समोर आलेला आहे. साहित्याची विक्री न करताच संगनमताने विक्रेत्याने अधिकची देयके काढली असल्याचे चौकशीत समोर आले होते.

या प्रकरणात बऱ्याच काळानंतर आता तालुका कृषी अधिकारी व अन्य एका कृषी अधिकाऱ्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वर्षभरापूर्वी हे प्रकरण चव्हाट्यावर आले. कृषी साहित्य विक्रेता व तीन कृषी कर्मचाऱ्यांविरुद्ध यापूर्वीच कारवाई करण्यात आली होती.

या प्रकरणाची फिर्याद तेव्हा तालुका कृषी अधिकारी वसंत राठोड यांनी दिली होती. आता त्यांनाही या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. २०२१-२२ या वर्षात जवळपास अडीच कोटी रुपयांचे कृषी साहित्य वितरण करण्यात आले.

हे वितरण चुकीच्या पद्धतीने झाल्याचे खात्यांतर्गत चौकशीतून स्पष्ट झाल्यानंतर या प्रकरणी तेव्हा सिंदखेडराजा पोलिस ठाण्यात कृषी विक्रेता सुरेश चव्हाण व तीन कृषी कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात झाला होता.

मंगळवारी (ता. ७) पुन्हा या प्रकरणात पोलिसांनी काही अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे नोंदविले. राठोड यांच्यासह गोपाळ बोरे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी वर्षभरात जवळपास ३० ते ४० लोकांचे जवाब नोंदविले आहेत. या कारवाईने पुन्हा एकदा कृषी खात्यात खळबळ उडाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Krushi Anudan: नांदेडमध्ये कृषी यांत्रिकीकरणातून १२.७० कोटींचे अनुदान वितरित

Raju Shetti: बोगस आणि निकृष्ट खते, कीडनाशकांमुळे आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान, राजू शेट्टींकडून कारवाईची मागणी

Maharashtra Khat Satha: खरिपासाठी १.५० लाख टन युरिया, २५ हजार टन डीएपीचा संरक्षित साठा

Pani Tanchai Upay: पाणी टंचाईवर मात करत पेणच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

Bhat Sheti in Maharashtra: सूर्या प्रकल्पामुळे उन्हाळी भातशेती बहरली

SCROLL FOR NEXT