Cow Milk Rate agrowon
ॲग्रो विशेष

Cow Milk Rate : गाय दूधाचे ५ रुपये अनुदान अटी शर्थीत अडकणार, शेतकरी राहणार वंचीत

Cow Milk Anudan : गाय दुधासाठी प्रतिलिटर किमान २९ रुपये दर देणाऱ्या दूध संघांनाच राज्य शासनाने जाहीर केलेल्या अनुदानाचा लाभ मिळणार आहे.

sandeep Shirguppe

Milk Rate Gokul Dudh Sangh : गाय दुधासाठी प्रतिलिटर किमान २९ रुपये दर देणाऱ्या दूध संघांनाच राज्य शासनाने जाहीर केलेल्या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गोकुळ ट्घ संघाव्यतिरिक्त इतर खासगी आणि काही सहकारी संघांना दूध पुरवठा करणारे हजारो शेतकरी यापासून वंचित राहणार आहेत.

गाय दुधाला दर मिळावा, यासाठी राज्यभर आंदोलन झाले. कोल्हापूर जिल्ह्यानेही यामध्ये पुढाकार घेतला. विविध पक्ष, संघटनांनी रास्ता रोको, दूध टँकर अडवून दूध उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला.

या पार्श्वभूमिवर, राज्य शासनाने गाय दुधासाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले. हे अनुदान देत असताना प्रत्येक दूध संघाकडून उत्पादकांना किमान २९ रुपये दर देणे बंधनकारक केले आहे.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध (गोकुळ) हाच दर किमान ३० रुपयांहून अधिक आहे. याउलट इतर काही खासगी आणि काही सहकारी दूध संघ २६ ते २७ रुपयांपर्यंतच दर देत असल्याने अडचण निर्माण झाली आहे. शासनाच्या अनुदानास पात्र ठरण्यासाठी त्या संघांना किमान २९ रुपये दराचा टप्पा गाठावा लागणार आहे.

मात्र, प्रतिलिटर दोन ते तीन रुपये दर वाढवणे या संघांना शक्य नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ते संघही उत्पादकांना प्रतिलिटर पाच रुपयांचा लाभ देण्यासाठी कोणतेही प्रयत्न करत नसल्याचे दिसून येत आहे. याचा दूध उत्पादकांना फटका बसणार आहे.

'गोकुळ'कडे गायीचे १ लाख लिटर दूध संकलित होत आहे. यामध्ये अनेक दूध संस्था आणि सभासदांचे कोअर बँकिंग किंवा जनावरांचे टॅगिंग झालेले नाही. त्यामुळे हे टॅगिंग करून घेण्यासाठी गोकुळने यंत्रणा सक्रिय केली आहे. याचा दूध उत्पादकांना फायदा होणार आहे.

याचवेळी इतर संघांनीही उत्पादकांना अनुदानाचा लाभ मिळावा, यासाठी नियोजन करावे लागणार आहे. वेळेत टॅगिंग झाले नाही, योग्य दर दिला नाही तर शासनाच्या अनुदान योजनेचा काडीचाही फायदा उत्पादकांना होणार नाही.

मल्टिस्टेटचीही होणार अडचण

मल्टिस्टेट दूध संघांनाही शासनाच्या नियमाचा फटका बसणार आहे. जे दूध संघ मल्टिस्टेट आहेत, ते इतर राज्यांतूनही दूध संकलन करतात. अशा संघांना या योजनेचा फायदा दिला जाणार नाही. शासनाने केलेल्या नियमानुसार गोकुळ गाय दधासाठी ३.५ फॅट आणि ८.३ एसएनएफसाठी प्रतिलिटर ३० रुपये ३० पैसे दर देत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection : नांदेड जिल्ह्यात आमदार रोहित पवार शेतकऱ्यांच्या बांधावर

Dam Water Levels : लघू प्रकल्पात १२, मध्यम प्रकल्पात १४ टक्के पाणीसाठा

Road Protest : सासुरे-कौठाळी रस्त्यासाठी ‘रास्ता रोको’

Water Scarcity : पाणीटंचाई टाळण्यासाठी वर्षभराचे नियोजन करा; पालकमंत्री जयकुमार गोरे

Goat Farming : शास्त्रीय व्यवस्थापनातून शेळीपालनात शाश्वत उत्पन्न

SCROLL FOR NEXT