Gram Panchayat Election Agrowon
ॲग्रो विशेष

Gondegaon Gram Panchayat : ‘गोंदेगाव’च्या ‘त्या’ निकालाला स्थगिती

High Court Decision : वाशीम जिल्ह्यातील गोंदेगाव ग्रामपंचायतीत उपसरपंच पदासाठी १४ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली आहे.

Team Agrowon

Nagpur News : वाशीम जिल्ह्यातील गोंदेगाव ग्रामपंचायतीत उपसरपंच पदासाठी १४ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली आहे.

तसेच, या प्रकरणात कोर्टाने अमरावतीच्या अतिरिक्त विभागीय आयुक्त, वाशिमच्या जिल्हाधिकारी यांच्यासह इतर प्रतिवादींना नोटीस बजावत ५ मेपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. ग्रामपंचायत सदस्य वैभव ऐकाडे यांनी नागपूर खंडपीठात ही याचिका दाखल केली आहे.

या प्रकरणावर न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्या समक्ष सुनावणी झाली. याचिकेनुसार, ४ जानेवारी २०२३ रोजी गोंदेगाव ग्रामपंचायतीत उपसरपंच पदाची निवडणूक झाली होती, ज्यात याचिकाकर्ता वैभव ऐकाडे विजयी झाले होते आणि लक्ष्मी ऐकाडे पराजित झाल्या होत्या.

ही निवडणूक प्रक्रिया कायदेशीर आणि व्यवस्थित पद्धतीने झाली नाही, असा आरोप करत लक्ष्मी ऐकाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी १० मार्च २०२४ रोजी निवडणूक सभा रद्द करण्याचा आदेश पारित केला.

त्या आदेशाविरोधात वैभव ऐकाडे यांनी विभागीय आयुक्त, अमरावती यांच्या कार्यालयात अपील दाखल केली. हे अपील विभागीय आयुक्त, अमरावती यांनी २६ डिसेंबर २०२४ रोजी फेटाळून लावले. या आदेशाला याचिकाकर्त्याने नागपूर खंडपीठात आव्हान दिले.

दरम्यान, वाशीम जिल्हाधिकाऱ्यांनी ३० मार्च २०२५ रोजी गोंदेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी १४ एप्रिल २०२५ रोजी निवडणूक घ्यावी, असा आदेश जारी केला. त्याविरोधातही वैभव ऐकाडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने याचिकाकर्त्याचा युक्तिवाद ऐकून १४ एप्रिल रोजी होणाऱ्या गोंदेगाव ग्रामपंचायत उपसरपंच निवडणुकीचे निकाल जाहीर न करण्याचा आदेश दिला आहे. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. प्रितेश अतकर यांनी बाजू मांडली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT