Cotton Seeds Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Seed Sales : खानदेशात कापूस बियाणे विक्री १५ मे पासून

Cotton Farming : पूर्वहंगामी कापूस उत्पादकांची मागणी, कापूस बियाण्यांचा काळाबाजार आदी बाबी लक्षात घेत खते, बियाणे वितरकांच्या असोसिएशनच्या मागणीनुसार प्रशासनाने कापूस बियाणे विक्री १५ मे पासून करण्यासंबंधी पत्र काढले आहे.

Team Agrowon

Jalgaon News : पूर्वहंगामी कापूस उत्पादकांची मागणी, कापूस बियाण्यांचा काळाबाजार आदी बाबी लक्षात घेत खते, बियाणे वितरकांच्या असोसिएशनच्या मागणीनुसार प्रशासनाने कापूस बियाणे विक्री १५ मे पासून करण्यासंबंधी पत्र काढले आहे. अशात खानदेशात कृत्रीम जलसाठाधारक शेतकरी आपली पूर्वहंगामी किंवा बागायती कापूस लागवड २० ते ३० मे या कालावधीतच करतील, असे चित्र आहे.

मागील काही वर्षे कापूस बियाणे १ जूनपासूनच विक्री सुरू करण्याची आणि शेतकऱ्यांनी जूनमध्येच पूर्वहंगामी किंवा बागायती कापूस लागवड करावी, अशी प्रशासनाची भूमिका होती. परंतु यात मेच्या मध्यानंतर किंवा २० ते ३० मे या कालावधीत कापूस लागवड अनेक शेतकरी करायचे. बियाणे स्थानिक बाजारात मिळत नसल्याने ते काळ्या बाजारातून आणले जात होते.

यात फसवणुकीचे प्रकारही होत होते. हा प्रकार थांबविण्यासाठी यंदा १५ मे पासून कापूस बियाणे अधिकृतपणे विविध कृषी केंद्रे, निविष्ठा विक्रीच्या दुकानांत मिळणार आहे. परंतु कृषी विभागाने १ जूननंतर लागवडी करण्याच्या केलेल्या आवाहनास शेतकरी प्रतिसाद देतील का, असा प्रश्न आहे.

कारण अनेक शेतकऱ्यांनी कापूस लागवडीसाठी शेत तयार करून त्यात सूक्ष्मसिंचन यंत्रणाही बसविली आहे. फक्त बियाणे आल्यावर लागवडीची कार्यवाही तेवढी राहिली आहे. कापूस लागवड २० ते ३० मे या कालावधीत झाल्यास चांगला लाभ होतो, पुढे क्षेत्र रिकामे करून अन्य पिकेही घेणे शक्य होते, असे शेतकरी मानतात.

परंतु गुलाबी बोंड अळीचे चक्र नष्ट करण्याचे शास्त्रज्ञ व कृषी विभागाचे प्रयत्न यामुळे अपयशी ठरतील असेही दिसत आहे. खानदेशात यंदा साडेआठ लाख हेक्टरवर कापूस लागवड अपेक्षित आहे. जळगाव जिल्ह्यात पाच लाख ५४ हजार हेक्टरवर लागवड होईल, असा अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: ‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ; कृषिमंत्री भरणे यांची विधानसभेत माहिती

Monsoon Rain: पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाचा जोर

Defective Groundnut Seeds: निकृष्ट भुईमूग बियाणे बदलून मिळणार; कृषिमंत्र्यांच्या निर्देशाने शेतकऱ्यांना दिलासा

Dimbhe Dam Reservoir: डिंभे धरणक्षेत्रात ६७ मिमी पाऊस; पूर्व भागातील शेतकरी अजूनही जोरदार सरींच्या प्रतीक्षेत

Monsoon Alert: मॉन्सूनच्या पावसाला दमदार सुरुवात

SCROLL FOR NEXT