Cotton Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Season : संततधार पावसामुळे कापूस हंगाम लांबण्याची शक्‍यता

Cotton Crop : दरवर्षी दसरा दिवाळीत लागणाऱ्या पैशाची सोय पहिल्या वेचणीतील कापसाच्या विक्रीतून होत होती. यावर्षी मात्र संततधार पावसाच्या परिणामी बोंडे उमलण्यास विलंब झाला आहे.

Team Agrowon

Nagpur News : दरवर्षी दसरा दिवाळीत लागणाऱ्या पैशाची सोय पहिल्या वेचणीतील कापसाच्या विक्रीतून होत होती. यावर्षी मात्र संततधार पावसाच्या परिणामी बोंडे उमलण्यास विलंब झाला आहे. त्यामुळे कापूस हंगाम लांबणीवर पडण्याची भीती केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

जळगाव खांदेश परिसरात कापसाची बहुतांशी ठिबकवर लागवड होते. त्यामुळेच या भागातील शेतकरी मॉन्सूनपूर्व कपाशी लागवड करतात. सरासरी मे मध्ये या भागात कापसाची लागवड होते. हा कापूस दरवर्षी दसरा, दिवाळीला काढणीसाठी येतो. त्यामुळे सण उत्सवाकरिता लागणाऱ्या पैशाची सोय करणे शक्‍य होते. यावर्षी देखील कापसाला बोंडधारणा होत ते परिपक्‍व होण्याच्या अवस्थेत आहे.

परंतु पावसाची संततधार असल्याने यातील बहुतांश बोंडे फुलली नसल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे तज्ज्ञ विवेक शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यात त्यांनी नुकतीच पाहणी केली. या वेळी एका झाडावर ४० ते ४५ बोंडे लगडलेली असून त्यातील दोन ते तीन बोंडेच उमलली असल्याचे समोर आले.

पावसाची संततधार सुरू आहे. त्याच्या परिणामी पिकाला सूर्यप्रकाशच मिळाला नाही. त्याचाही परिणाम बोंडे फुलण्यावर झाला आहे. परिणामी यंदाच्या हंगामात कापसाचा हंगाम काही दिवस लांबेल, अशी भीती वर्तविली जात आहे. त्याच कारणामुळे दसरा, दिवाळीच्या मुहूर्तावर बाजारात कापसाची मोठी आवक होईल, ही शक्‍यताही मावळली आहे.

जळगाव जिल्ह्यात कापसाची मॉन्सूनपूर्व लागवड होते. विदर्भासह अकोला जिल्ह्यात मात्र जूनमध्ये कापूसलागवड केली जाते. या भागातही पावसाची संततधार असल्याने पीक सध्या फुलावर आहे. त्यामुळे हंगाम लांबण्याची शक्‍यता आहे. - डॉ. विवेक शहा, शास्त्रज्ञ,
केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर
मॉन्सूनच्या पाण्यावरच विदर्भात कापसाची लागवड होते. यावर्षी मॉन्सूनने सुरुवातीला उघडीप दिली आणि तो उशिरा बरसला. त्यामुळे कापसाची लागवडही प्रभावीत झाली. सुरुवातीपासूनच कापूस हंगाम उशिरा सुरू झाल्याने आता पावसाची संततधार आहे. त्यामुळे कापूस बोंडे परिपक्‍व होणे अपेक्षित असताना काही भागांत पीक फुलावरच आहे. नवरात्राच्या पूर्वी अनेक शेतकरी कापूस वेचणीला सुरुवात म्हणून सितादही करतात. यावर्षी ते शक्‍य वाटत नाही.
- प्रकाश पुप्पलवार, कापूस उत्पादक शेतकरी, खैरगाव देशमुख, यवतमाळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jalgaon Assembly Election Result 2024 : खानदेशात महायुतीची मुसंडी; काँग्रेसचे दिग्गज पराभूत

Rohit Patil NCP-SP : विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना मोठा फटका; तरिही सर्वात तरूण आमदार राष्ट्रवादीचाच

Maharashtra Assembly Result 2024 : अहिल्यानगर, नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा ‘सुपडासाफ’

Food Processing Industry : प्रक्रिया उद्योगात मिळविली ठळक ओळख

Food Processing Industry : ‘माऊली’ ब्रॅंड उत्पादनांचा होतोय विस्तार

SCROLL FOR NEXT