Cotton Market Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Market : पांढऱ्या सोन्याचे दर सात हजारांवर स्थिरावले

Cotton Rate : शेतकरी आर्थिक अडचणीत; पावसामुळे भावात घसरण

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा

Cotton News : यवतमाळ : यंदा कापसाच्या उत्पादनात घट आलेली आहे. दर वाढतील, या अपेक्षेने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र गीरपिटीनंतर कापसाच्या दरात मोठी घसरण झाली, दर सहा हजार नऊशे रुपयांवर आले आहेत.

यंदा सुरुवातीपासून कापसाला चांगले दर मिळतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडली आहे. गेल्या वर्षी कापसाला चांगले दर मिळाले होते. अखेरच्या टप्प्यात दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच त्याचा फायदा झाला.

यंदा हंगामाच्या सुरुवातीपासून कापसाला चांगले दर मिळण्याचा अंदाज तज्ज्ञांचा होता. तो खरा होताना दिसत असतानाच वादळी पावसाने शेतकऱ्यांचा घात केला. हंगामाच्या सुरुवातीपासूनच कापसाला हमीभावापेक्षा जास्त दर मिळत होता.

कापसाचे पीक चांगले दिसतानाही उत्पादन कमी आल्याने शेतकरी मेटाकुटीस आले. कपाशीला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. पिकांची वाढ खुंटल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. राहिलेली कसर वादळी पावसाने भरून काढली. त्यामुळे उत्पादनात मोठी घसरण झाली. गेल्या वर्षी शेवटच्या टप्प्यात कापसाला १२ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला होता.

यंदा खासगी बाजाराचा प्रारंभ झाला, तेव्हा दहा हजार रुपये दर देण्यात आला. त्यामुळे या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता होती. मात्र, दरवाढीची शक्यता आता धूसर झाली आहे. कापसाच्या दरात घसरण झाली असून, दर सहा हजार नऊशे रुपयांवर स्थिरावले आहेत. एका मागून एक संकट येत असल्याने यंदाचा हंगामही शेतकऱ्यांच्या हातून गेल्यातच जमा आहे.

कापसाच्या उत्पादनात घट झाली आहे. मागणी वाढल्याने कापसाचे भाव वाढतील, अशी अपेक्षा होती. अतिवृष्टीनंतर वादळी पावसाने अडचण झाली. उत्पादन घटले असून, सध्या कापसाचे दर सात हजार रुपयांच्या आत आले आहेत.

हा भाव पाहता लावगड खर्चही निघणे कठीण झाले आहे. ढगाळ वातावरणाने रब्बी हंगामातील हरभरा पिकावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.
- दिनेश गायकवाड, शेतकरी, बोरी खुर्द

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT