Cotton  Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Procurement : परभणी बाजार समितीत आजपासून कापूस खरेदी बंद

TMC Market Yard Cotton Procurement : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टीएमसी मार्केट यार्डावरील कापूस खरेदी सोमवार (ता. २९)पासून बंद राहणार आहे.

Team Agrowon

Parbhani News : परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत कापूस जिनिंग प्रेसिंग संघटना व हमाल-माथाडी कामगार संघटना यांच्यात कापूस हमाली दर वाढीसंदर्भात कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे हमाल कामगार काम बंद ठेवणार आहेत. परिणामी, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टीएमसी मार्केट यार्डावरील कापूस खरेदी सोमवार (ता. २९)पासून बंद राहणार आहे.

परभणी जिनिंग प्रेसिंग कापूस खरेदीदार व्यापारी असोसिएशन व परभणी हमाल मजदूर युनियन (लाल बावटा), मराठवाडा मजदूर माथाडी मजदूर युनियन (लाल बावटा) परभणी, यांच्यातील नवीन हमाल दरवाढी बाबत वेळोवेळी चर्चा करण्यात आली.

परंतु कोणताही तोडगा निघाला नसल्यामुळे परभणी जिनिंग प्रेसिंग कापूस खरेदीदार व्यापारी असोसिएशन यांनी कापूस खरेदी बंद ठेवणार असल्याचे पत्र दिले आहे. तसेच हमाल मजदूर युनियन यांनी जिनिंग आवारातील हमाली कामकाज बंद ठेवणार असल्याचे पत्र कृषी उत्पन्न बाजार समितीला दिलेले आहे.

त्यामुळे परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टी. एम. सी. मार्केट यार्डातील कापूस खरेदी सोमवार (ता. २९)पासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी याची नोंद घेऊन आपला कापूस पुढील सूचनेपर्यंत बाजार समितीच्या मार्केट यार्डावर विक्रीस आणू नये, असे आवाहन बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले, उपसभापती अजय चव्हाण व सर्व संचालक मंडळ, सचिव संजय तळणीकर यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief: मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करून तातडीने मदत द्या

Exam Stress Relief : परीक्षा जवळ आलीये अन् टेन्शन वाढलंय? 'या' सोप्या टिप्सने ताण होईल छुमंतर!

Women Farmers Contribution: मोरोक्कोच्या बहरलेल्या शेतीतील अदृश्य हात

Interview With Rakesh Kaithwas : शेतकरी कंपन्यांच्या बळकटीकरणातून मूल्यवर्धनाला चालना

Bullock Safety Tips: बैलाच्या वजनानुसार बैलगाडीत किती ऊस भरावा?

SCROLL FOR NEXT