Cotton Market Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Procurement : जालना बाजार समितीत सीसीआयची कापूस खरेदी सुरू

APMC Market : जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये भारतीय कापूस निगम अर्थात सीसीआयची कापूस खरेदी सोमवारपासून (ता. ११) सुरू करण्यात आली.

Team Agrowon

Jalna News : जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये भारतीय कापूस निगम अर्थात सीसीआयची कापूस खरेदी सोमवारपासून (ता. ११) सुरू करण्यात आली. बाजार समितीचे सचिव मोहन राठोड यांच्या हस्ते पूजन व बाजार समितीचे प्रशासक अनिलकुमार दाबशेंडे यांच्या हस्ते काटा पूजन करून कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली.

सर्वांत पहिले कापूस घेऊन येणारे शेतकरी अमोल कुंडलिक बोंद्रे (रा. भाटेपुरी), कौतिक परमेश्वर पवार (रा. नजीक पांगरी) यांचा सचिव मोहन राठोड यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. दोन्ही शेतकऱ्यांनी आणलेल्या कापसाला ७०२० रुपये प्रतिक्विंटलचा दर देत सीसीआयने त्याची खरेदी केली.

सोमवारी जवळपास १८० क्विंटल कापसाची खरेदी सीसीआयमार्फत करण्यात आली. या वेळी सीसीआयचे केंद्रप्रमुख महेश बामणे यांचाही बाजार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. बामणे म्हणाले, की शेतकऱ्यांनी चांगला प्रतिचा कापूस आणावा. ओला कापूस विक्रीसाठी आणू नये.

या कापूस खरेदी प्रारंभप्रसंगी बाजार समितीचे सहायक सचिव अनिल खंडाळे, भरत तनपुरे, लेखापाल अजय मिरकड, निरीक्षक प्रसाद काकडे, पर्यवेक्षक संजय जाधव, अभियंता हार्दिक फलके तसेच बाजार समितीचे प्रफुल्ल हिवरेकर, संजय मोठे, अक्षय खंडाळे, रामेश्वर पांडे, परमेश्वर राऊत यांच्यासह शेतकरी, व्यापारी, हमाल व इतर बाजार घटकांची उपस्थिती होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT