Cotton Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Production : कमी पावसाने कापूस उत्पादनाला फटका बसणार

Cotton Market : यंदा पाऊसमान कमी आहे. तसेच देशात कापूस लागवड मागील हंगामाच्या तुलनेत पाच टक्क्यांनी कमी झाली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : यंदा पाऊसमान कमी आहे. तसेच देशात कापूस लागवड मागील हंगामाच्या तुलनेत पाच टक्क्यांनी कमी झाली आहे. देशात यंदाच्या हंगामात कापसाचे उत्पादन ३२० ते ३२५ लाख गाठी (एक गाठ १७० किलो रुई) एवढे राहू शकते, असा अंदाज खानदेश जिनिंग-प्रेसिंग कारखानदार असोसिएशनच्या नॉर्थ गोवा येथे नुकत्याच झालेल्या दोनदिवसीय बैठकीत व्यक्त करण्यात आला.

‘असोसिएशन’चे अध्यक्ष प्रदीप जैन, उपाध्यक्ष अनिल सोमाणी, जीवन बयस, सचिव लक्ष्मण पाटील, अविनाश काबरा, विनय कोठारी, तसेच कापूस उद्योग जगतातून कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अतुल गणात्रा, महाराष्ट्र राज्य जिनिंग-प्रेसिंग असोसिएशनचे अध्यक्ष भूपेंद्रसिंह राजपाल, अरुण खेतान आदी उपस्थित होते. दोन दिवस या बैठकीत कापूस व्यापार व उत्पादन, पुढील अडचणी, गरजा यावर चर्चा झाली.

गणात्रा म्हणाले, ‘‘गेल्या हंगामात देशात ३१६ लाख गाठींची निर्मिती, तर १३ लाख गाठींची आयात झाली. फक्त १६ लाख गाठींची निर्यात झाली. देशात ३११ लाख गाठींचा वापर सरत्या हंगामात झाला आहे. यंदा कोरडवाहू कापसाची लागवड १५ ते २० दिवस उशिराने झाली. कारण जूनमध्ये पावसाचा खंड होता.

देशातील लागवड पाच टक्के कमी झाली आहे. जून व ऑगस्टमध्ये मिळून ४५ दिवस पावसाचा खंड होता. यामुळे मागील हंगामाच्या तुलनेत यंदा कापसाचे उत्पादन कमी येईल. देशात यंदा वस्त्रोद्योग १०० टक्के क्षमतेने कार्यरत राहिल्यास कापसाचा वापर वाढू शकतो.’’

‘व्यापारासाठी पुढील २० दिवस महत्त्वाचे’

‘‘जगात कापडाचा उपयोग कमी झाला आहे. पण अमेरिका व चीनमध्ये कापूस उत्पादनात घट येईल. अमेरिकेतील कापूस उत्पादनात ३५ लाख गाठींची घट येईल, असा अंदाज नुकताच आला आहे.

यातच पुढील २० दिवस कापूस व्यापारासंबंधी महत्त्वाचे असून, या कालावधीमधील घडामोडींवर बाजाराची चाल अवलंबून असेल,’’ असे कापूस व्यापाराचे जाणकार रमण भल्ला यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

Nashik APMC: नाशिक बाजार समितीचे विभाजन रद्द करा : शिवाजी चुंभळे

Rahul Gandhi: दहा वर्षांत १५२ पेपरफुटीची प्रकरणे, तरीही एकाही दोषीला शिक्षा का नाही? राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Farmers Protest Suspend: देवगावातील ‘सरण आंदोलन’ तात्पुरते स्थगित

SCROLL FOR NEXT