Cotton Procurement Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Procurement Center : परभणी बाजार समितीअंतर्गंत सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू होणार

Parbhani APMC : परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गंत यंदाच्या २०२३-२४ हंगामात कापूस खरेदीसाठी भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) ने खरेदी केंद्र प्रस्तावित केले आहे.

Team Agrowon

Parbhani News : परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गंत यंदाच्या २०२३-२४ हंगामात कापूस खरेदीसाठी भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) ने खरेदी केंद्र प्रस्तावित केले आहे. हे खरेदी केंद्र लवकरच कार्यान्वीत होईल अशी माहिती बाजार समितीतर्फे देण्यात आली आहे.

मागील अनेक वर्षापासून परभणी येथील सीसीआयची कापूस खरेदी बंद आहे. त्यामुळे परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाने गतवर्षी (२०२३) च्या जून महिन्याच्या मासिक सभेत ठराव पारित करून परभणी येथे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत भारतीय कापूस महामंडळाचे सरव्यवस्थापक यांच्याशी पत्रव्यवहार केला.

खासदार संजय जाधव, परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील, पाथरीचे आमदार सुरेश वरपुडकर यांनी देखील या ठिकाणी सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. आमदार पाटील यांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला.

कृषी उत्पन्न बाजार समिती परभणीचे सभापती पंढरीनाथ घुले, उपसभापती अजय चव्हाण, संचालक मंडळ यांनी देखील परभणी येथे सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू होण्यासाठी वेळोवेळी वरिष्ठांकडे पाठपुरावा केला. त्याची सीसीआयने दखल घेतली आहे. ‘सीसीआय’मार्फत सोमवारी (ता.१५) लघू निविदा सूचना (शॉर्ट टेंडर नोटीस) काढण्यात आलेली आहे. त्यानुसार परभणी जिल्ह्यातील सीसीआयच्या प्रस्तावित केंद्रात परभणी, पाथरी, गंगाखेड या ठिकाणांचा समावेश आहे.

परभणी येथे सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू झाल्यास शेतकऱ्यांच्या कापसास योग्य भाव मिळू शकेल. त्यासाठी शेतकऱ्यांनी कापसाची प्रतवारी करून बाजारपेठेत विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात येते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT