Cotton Market  Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Market : परभणी जिल्ह्यात कापूसदर दबावातच

Cotton Rate : परभणी जिल्ह्यातील कापसाच्या बाजारपेठांमध्ये कापूसदर दबावातच आहेत.

Team Agrowon

Parbhani Cotton Market : परभणी जिल्ह्यातील कापसाच्या बाजारपेठांमध्ये कापूसदर दबावातच आहेत. मॉन्सू्न्नोत्तर पावसात भिजलेल्या कापसाला किमान दर सहा हजार रुपयांपेक्षा कमी मिळत आहे. चांगल्या प्रतीच्या कापसाचे कमाल दर सात हजार रुपयांवर आहेत.

सोमवारी (ता. १) मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाची २२०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६००० ते कमाल ६६०० रुपये तर सरासरी ६३०० रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता. २९) कापसाची २९०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ७०२५ ते कमाल ७१०० रुपये तर सरासरी ७०५० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. २८) कापसाची ५७०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमानन ५७०० ते कमाल ६६०० रुपये तर सरासरी ६४५० रुपये दर मिळाले.

सेलू बाजार समितीत पावसात भिजलेल्या कापसाला मंगळवारी (ता. २) प्रतिक्विंटल ५९५५ ते ६८०० रुपये तर न भिजलेल्या कापसाचे दर प्रतिक्विंटल किमान ६९८० ते कमाल ७०९४ रुपये तर सरासरी ७०२५ रुपये मिळाले. भिजलेल्या कापसाला सोमवारी (ता. १) प्रतिक्विंटल ५७०० ते ६७०० रुपये दर मिळाले.

न भिजलेल्या कापसाला प्रतिक्विंटल किमान ६८०० ते कमाल ७०५५ रुपये तर सरासरी ६९७५ रुपये दर मिळाले. भिजलेल्या कापसाला बुधवारी (ता. २७) प्रतिक्विंटल किमान ५८०० ते कमाल ७००० रुपये दर मिळाले तर न भिजलेल्या कापसाला प्रतिक्विंटल किमान ७०२० ते कमाल ७१५० रुपये तर सरासरी ७१४० रुपये दर मिळाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT