Cotton Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Cultivation : नगर जिल्ह्यात कापसाच्या लागवडीला सुरुवात

Monsoon Update : यंदा मॉन्सूनचा पाऊस पंधरा दिवस उशिराने आला. त्यामुळे मूग, उडदाचे क्षेत्र कमी होऊन त्याजागी बऱ्यापैकी कापसाचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज आहे.

Team Agrowon

Nagar Monsoon News : मॉन्सूनचा पाऊस दाखल होऊन पावसाला सुरुवात होताच नगर जिल्ह्यातील बहुतांश भागात कापसाच्या लागवडीला सुरुवात झाली आहे. कापसाच्या लागवडीचा कालावधी अजून बऱ्यापैकी शिल्लक असल्याने यंदा कापसाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे.

नगर जिल्ह्यात कापसाचे सरासरी १ लाख २२ हजार ८७ हेक्टर क्षेत्र असून गेल्या वर्षी १ लाख ३१ हजार ९६२ हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती. यंदा १ लाख २७ हजार ४३० हेक्टर क्षेत्र प्रास्तावित केले आहे.

यंदा मॉन्सूनचा पाऊस पंधरा दिवस उशिराने आला. त्यामुळे मूग, उडदाचे क्षेत्र कमी होऊन त्याजागी बऱ्यापैकी कापसाचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज आहे. दोन दिवसांपासून पाऊस सुरू झाल्याने शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी भागांत कापसाच्या लागवडीला सुरुवात झाली आहे.

श्रीरामपूर तालुक्यासह काही भागात उपलब्ध पाण्याच्या आधारावर आधीच लागवड केलेल्या कापसालाही या पावसाने जीवदान मिळाले आहे. पाऊस सुरू झाल्याने खते-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची बाजारात गर्दी होत आहे.

ठरावीक वाणांची चढ्या दराने विक्री

नगर जिल्ह्यात खते, बियाण्यांची चढ्या दराने विक्री झाली, तर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा कृषी विभागांसह जिल्हा प्रशासनाने दिला, मात्र कापसाच्या ज्या वाणांना अधिक मागणी आहे. त्या वाणांची चढ्या दराने विक्री सुरूच आहे.

शेतकऱ्यांना बिले मात्र मूळ किमतीतच दिले जात आहे. अधिक विचारणा केली तर संबंधित विक्रेते बियाणे शिल्लक नसल्याचे सांगत आहेत.

कृषी विभागाकडेही तक्रारी आल्यातर कारवाई करता येईल असे कृषीचे अधिकारी सांगतात. ही बाब जरी खरी असली तरी तक्रारीची वाट न पाहता स्टिंग ऑपरेशन करूनही हे प्रकार बंद व्हायला हवेत अशी अपेक्षा एका शेतकऱ्याने व्यक्त केली.

कपाशीच्या काही वाणांना शेतकऱ्यांनी पसंती दिल्यामुळे कृषी दुकानदार बियाण्यांची कृत्रिम टंचाई भासवीत आहे. ४७५ ग्रॅम बियाण्यांच्या पाकिटामागे तीनशे ते साडेतीनशे रुपये जास्त घेऊन शेतकऱ्यांची लूट करीत आहे. याप्रकरणी कृषी विभागाने तातडीने कारवाई करावी.
विकास मगर, प्रगतशील शेतकरी, टाकळीभान, ता. श्रीरामपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT