Krushna Kardile Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Cultivation : कापूस घन लागवड लाभदायक

Krushna Kardile : कापूस लागवड पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे. पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत अधिक झाडांची संख्या वाढून एकरी उत्पन्न वाढवता येईल, असे मत कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ कृष्णा कर्डिले यांनी व्यक्त केले.

Team Agrowon

Beed News : कापूस लागवड पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे. पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत अधिक झाडांची संख्या वाढून एकरी उत्पन्न वाढवता येईल, असे मत कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ कृष्णा कर्डिले यांनी व्यक्त केले.

दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र अंबाजोगाई यांच्या माध्यमातून खापरवाडी येथे ‘सघन कापूस प्रक्षेत्र दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री कर्डिले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच ऋषिकेश पटाईत, तर मार्गदर्शक म्हणून डॉ. प्रदीप सांगळे, कृषिभूषण शेतकरी प्रल्हाद गवारे आदींची उपस्थित होती.

कर्डिले म्हणाले, की अतिघन कापूस लागवड पद्धती मध्ये अनेक बाबी विचारात घेता आपला कापूस हा सरळ वाढणारा असला पाहिजे. जर कापूस आडवा जास्त वाढत असेल तर त्यामध्ये बोंड सड होते, झाडाची वाढ नियंत्रित ठेवणे, बोंडचा आकार एकसमान ठेवण्यासाठी झाडांचे शेंडे खुडणे महत्त्वाचे आहे.

लागवडीच्या सुरुवातीला गळफांदी छाटून टाकावी. त्यामुळे फळफांदीला अन्नपुरवठा होतो.डॉ. सांगळे म्हणाले, की फावरणी कमी करण्याच्या अनुषंगाने रसशोषक कीडसाठी पिवळे चिकट सापळे आणि फुलकीडसाठी निळे सापळे याचा वापर करावा. घरच्या घरी कमी किमतीत चिकट सापळे तयार करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

कृषी विज्ञान केंद्रामधे अनेक प्रकारच्या जैविक औषधे उपलब्ध आहेत, शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असेही ते म्हणाले. प्रगतशील शेतकरी सुभाष इथापे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यल्लालिंग चिंतले यांनी तर आभार सुरज पोकळे यांनी मानले. कार्यक्रमास गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT