Humani Control Agrowon
ॲग्रो विशेष

Humani Control : प्रकाश सापळ्यांद्वारे करा हुमणी भुंगेऱ्यांचे नियंत्रण

Light Trap Use : ‘केविके’चे प्रमुख डॉ. प्रशांत शेटे यांचे आवाहन

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Narayangaon News : नारायणगाव : ‘‘पूर्वमोसमी पावसानंतर आपल्या भागात वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत असतो. पाऊस पडल्यानंतर तीन ते चार दिवसांनी हुमणी किडीचे भुंगेरे वरती येऊन शेतातील सर्व पिकांना हानी करतात. त्यामुळे प्रकाश सापळे वापरून या किडीचे एकात्मिक व्यवस्थापन करावे,’’ असे आवाहन येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. प्रशांत शेटे यांनी केले.

डॉ. शेटे म्हणाले,‘‘भाजीपाला पीक, फळपीक, कडधान्ये, तेलवर्गीय, डाळवर्गीय, चारा पिके आदींवर हुमणी किडीचा प्रादुर्भाव होतो. हुमणी कीड अंडी, अळी, कोष व भुंगेरे या चार अवस्थेतून जाते. त्यापैकी वळीवाचा पाऊस पडून गेल्यानंतर पाच ते दहा दिवस भुंगेरे अवस्था ही जमिनीच्या वर येते.

सुप्तावस्थेत असलेले भुंगेरे सूर्यास्तानंतर बाभूळ, कडुनिंब, बोर, चिंच, पिंपळ, शेवगा, गुलमोहर आदी २०० प्रकारच्या झाडांवरील पाने खाऊन जगतात. हे भुंगेरे पावसाळी किंवा ढगाळ वातावरणात संध्याकाळी सूर्यास्तानंतर बाहेर पडतात आणि त्यानंतर ते जमिनीत जातात. तेथे भुंगेरा मादी ५० ते ६० अंडी देते. किडीचे भुंगेरे गोळा करून त्यांचे नियंत्रण मारले तर आपल्या पिकाचे नुकसान टाळू शकतो. यासाठी प्रकाश सापळे वापरून या किडीचा बंदोबस्त करता येतो.’’

प्रकाश सापळे असे करा तयार...
- प्रथमतः दोन बाय दोन फुटांचा गादीवाफा तयार करावा
- त्यामध्ये पॉलिथिन कागद टाकून त्यात साधारणपणे अर्धा फुटापर्यंत रॉकेल मिश्रित पाणी किंवा निंबोळी अर्क मिश्रित पाणी भरावे.
- त्याच्यावर एक ते दीड फुटांवर विजेचा दिवा चालू करावा.
- रात्री दिवा चालू झाल्यानंतर त्या प्रकाशाकडे हे भुंगेरे आकर्षित होतात.
- ते खाली ठेवलेल्या पाण्यात पडून मरतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT