Maize Market Agrowon
ॲग्रो विशेष

Maize Research Center : मका संशोधन केंद्राचे योगदान मोलाचे

Maize Variety : आंतरराष्ट्रीय मका व गहू संशोधन संस्थेने महाराष्ट्रातील मका संशोधन केंद्राच्या माध्यमतून नवीन वाण निर्मितीसाठी शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर प्रयोग घेतले आहेत.

Team Agrowon

Kolhapur News : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीअंतर्गत येथील अखिल भारतीय समन्वयित मका संशोधन केंद्राने मका पिकासाठी उत्तम वाणाची निर्मिती व मका उत्पादन तंत्रज्ञानाच्या अनेक शिफारशी देऊन मोलाचे योगदान दिल्याचे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय मका व गहू संशोधन संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. पी. एच. झैदी यांनी केले.

तारदाळ (ता. हातकणंगले) येथे प्रक्षेत्र शिवार फेरी व शेतकरी मेळाव्यामध्ये डॉ. झैदी बोलत होते. ते म्हणाले, की आंतरराष्ट्रीय मका व गहू संशोधन संस्थेने महाराष्ट्रातील मका संशोधन केंद्राच्या माध्यमतून नवीन वाण निर्मितीसाठी शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर प्रयोग घेतले आहेत.

त्यामुळे निश्चितच नवीन मका वाणाची निर्मिती होऊन शेतकऱ्याचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यास मदत होणार आहे. महाजन व मुजावर यांच्या शेतावर प्रक्षेत्र भेट झाली. अखिल भारतीय समन्वयित मका संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. सुनील कराड यांनी मक्याचे महत्त्व व उत्पादन तंत्रज्ञान या विषयी मार्गदर्शन केले.

डॉ. सुहास भिंगरदिवे यांनी सूत्रसंचालन केले. सुशांत महाडिक, आळते विस्तार गट प्रमुख बाबूराव आवळे, कृषी सहायक धनाजी शिरगावे, सागर शेळके यांनी परिश्रम घेतले. आळते गावचे पोलीस पाटील रियाज मुजावर, संदीप बनकर, तारदाळचे राजू बन्ने गुंडा विभुते आदी शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT