Nampur Market Committee
Nampur Market Committee Agrowon
ॲग्रो विशेष

Nampur Market Committee : नामपूर बाजार समितीतील बांधकामे चर्चेत

Team Agrowon

APMC Nashik News : सटाणा तालुक्यातील नामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. आता येथे झालेल्या नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, उपबाजार आवारातील सुलभ शौचालय तसेच करंजाड उपबाजार आवार येथील शेडमधील ऑफिस बांधकाम हे विषय चर्चेत आले आहेत.

या झालेल्या कामांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पणन संचालकांकडे पत्राद्वारे केल्याची माहिती सभापती कृष्णा भामरे यांनी दिली. तर भामरे यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर त्यांनी नकार दिला.

त्यावर संचालकांनी अविश्वास दाखल केला होता. त्यानंतर चौकशीसाठी हालचाली करण्यात आल्या, असे काही संचालकांनी सांगितले. या प्रकरणात माजी सभापती आणि विद्यमान सभापतींमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.

याबाबत पणन संचलकांना दिलेल्या निवेदनात भामरे यांनी नमूद केले आहे की, नामपूर बाजार समितीच्या प्रशासकीय इमारतीचे झालेले बांधकाम अतिशय नित्कृष्ट दर्जाचे असून हे काम प्लॅन ईस्टीमेटप्रमाणे झालेले नाही. असे असतानाही याकामी ठेकेदारास सर्व बिले दिले.

मात्र असताना बांधकामाची मुदत संपलेली असूनही प्रशासकीय इमारत अजून बाजार समितीच्या ताब्यात देण्यात आलेली नाही, असा मुद्दा भामरे यांनी उपस्थित केला आहे.

याकामी बाजार समिती इमारत बांधकामाचे कार्यादेश ठेकेदार आर. पी. अहिरे यांना देण्यात आले. मात्र त्यांच्या नावावर बाजार समितीचे माजी सभापती संजय गोविंद भामरे यांनी काम केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच या कामाचे आतापर्यंत अनेक तक्रार अर्ज प्राप्त झाले. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. या कामाविषयी मी संचालक असताना वेळोवेळी तक्रारी केल्या. परंतु प्लॅन ईस्टीमेटपेक्षा वाढीव कामे दाखवून वाढीव बिले काढण्यात आली असल्याचा आरोप भामरे यांनी पत्रात केला आहे.

तसेच बाजार समिती उपबाजार आवार नळकस रोड लिलाव आवारात सुलभ शौचालय कामाचे कार्यादेश ठेकेदाराचा कुठल्याही प्रकारच नोंदणीकृत परवाना नसताना ९ लाख ९६ हजार ३१७ रुपयांचे काम तत्कालीन सभापती शांताराम निकम यांनी दिलेले आहे. तसेच या कामकाजाची ६ लाख रुपयांची बिले काढण्यात आली आहेत.

तसेच करंजाड उपबाजार आवार येथील शेडमधील ऑफिस बांधकाम हे ५ लाख ९९ हजार रकमेचे आहे. या कामकाजाची प्लॅन ईस्टीमेट प्रमाणे आहे किंवा कसे त्यामुळे निकम यांनी कोणत्याही प्रकारच्या नोंदणीकृत ठेकेदारास काम न देता स्वार्थापोटी कामे दिले, असा आरोप करण्यात आला आहे.

मुदत संपण्याच्या तोंडावर प्रकरणे चव्हाट्यावर

थेट बाजार समितीच्या माजी सभापती संजय भामरे व शांताराम निकम यांनी केलेले कामकाज योग्य आहे किंवा चुकीचे हे चौकशीअंति सिद्ध होईल. मात्र भामरे यांनी हा गंभीर मुद्दा समोर आणल्याने बाजार समितीतील प्रकरणे चव्हाट्यावर आली आहेत.

जिल्हा उपनिबंधकांनी काम मंजूर केल्यानुसार ते देण्यात आले. यात काहीही गैर झालेले नाही. एकूण रकमेच्या ९ लाख ९६ हजार रुपयांचे बिल असताना त्यापोटी विद्यमान सभापती भामरे यांनी फक्त ६ लाख अदा का केले. आता ठेकेदार हा परवानाधारक नसल्याचा मुद्दा उपस्थित करून दिशाभूल केली जात आहे. हे राजकीय हेवेदावे आहेत. यात काही तथ्य नाही.
शांताराम निकम, माजी सभापती-नामपूर बाजार समिती
सभापतिपदाची आवर्तनानुसार मुदत संपल्याने त्यांचा राजीनामा मागितला याप्रकरणी त्यांनी राग धरून ही चौकशी लावली असावी. ज्येष्ठ नात्याने त्यांचा आदर आहे, मात्र हे आरोप चुकीचे आहेत.
संजय भामरे, माजी सभापती-नामपूर बाजार समिती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

SCROLL FOR NEXT