Gharkul Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Gharkul Scheme : घरकुलांची बांधकामे तत्काळ पूर्ण करावीत

विविध योजना अंतर्गत घरकुल लाभार्थींनी कार्यवाही टाळण्‍यासाठी ३१ मार्च २०२३ पूर्वी निर्धारित वेळेत घरकुल बांधकाम पूर्ण करावे.

Team Agrowon

Parbhani News : जिल्ह्यातील केंद्र तसेच राज्य पुरस्कृत विविध योजनाअंतर्गंत घरकुल बांधकामासाठी (Gharku Scheme) निवड झालेल्या लाभार्थानी येत्या ३१ मार्च पर्यंत सर्व अपूर्ण घरकुलाची बांधकामे पूर्ण करावेत.

अनुदानाचा पहिला हप्‍ता मिळाल्यानंतरही घरकुल बांधकाम सुरु केलेले नाहीत त्या लाभार्थींकडुन घरकुल लाभाची रक्‍कम वसुलीची कार्यवाही करण्‍याचे शासन स्तरावरून निर्देश देण्यात आले आहेत.

केंद्र पुरस्‍कृत प्रधानमंत्री आवास योजना व राज्‍य पुरस्‍कृत रमाई आवास योजना (Ramai Awas Scheme), शबरी आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना अंतर्गत परभणी जिल्ह्यांमध्ये अपूर्ण घरकुल लाभार्थींची संख्‍या मोठ्या प्रमाणावर आहे.

जिल्‍हा प्रशासनामार्फत याबाबत पाठपुरावा करण्‍यात येत असून अपूर्ण लाभार्थींना बांधकाम निर्धारित वेळेत पूर्ण करण्‍यासाठी तालुका तसेच ग्रामपंचायत स्तरावरून लाभार्थींना नोटिसा देण्‍यात आल्‍या आहेत.

याबाबत सर्व तालुक्‍यांना वसुलीची कार्यवाही करून रक्‍कम शासनखाती भरणा करण्‍या बाबतच्‍या सूचना गुरुवारी (ता. ९) झालेल्या बैठकीमध्‍ये जिल्‍हा प्रशासनाकडून देण्‍यात आल्‍या आहेत.

पहिला हप्‍त्याचे वितरण ८ हजार ७१८ लाभार्थींना, द्वितीय हप्‍ता वितरण २ हजार २९२ लाभार्थींना तर तृतीय हप्‍ता वितरण १ हजार १७५ लाभार्थींना वितरित करण्यात आला आहे. त्यापैकी १ हजार ७० लाभार्थींकडून घरकुलांची कामे पूर्ण करण्‍यात आली आहेत.

विविध योजना अंतर्गत घरकुल लाभार्थींनी कार्यवाही टाळण्‍यासाठी ३१ मार्च २०२३ पूर्वी निर्धारित वेळेत घरकुल बांधकाम पूर्ण करावे.

अन्‍यथा पुढील ७ दिवसांमध्‍ये पहिला हप्‍ता घेउन बांधकाम सुरु न केलेल्‍या लाभार्थींवर वसुलीची कार्यवाही करण्‍यात येणार असून अशा लाभार्थींना व त्‍यांच्‍या कुटुंबीयांना यापुढे घरकुल लाभ देण्‍यात येणार नाही, असे निर्देश जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रश्‍मी खांडेकर यांनी दिले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT