Dairy Business Agrowon
ॲग्रो विशेष

Dairy Business : खासगी संघांकडून दुग्ध व्यवसाय उद्‍ध्वस्त करण्याचे षड्‍यंत्र

Milk production : दुधाचा उत्पादन खर्च बत्तीस रुपये असताना, उत्पादन खर्चाबरोबर दर देऊन दुग्ध व्यवसाय कसा टिकेल, खासगी संघ संगनमताने दर कमी करून दुग्ध व्यवसाय उद्‍ध्वस्त करीत आहेत.

Team Agrowon

Solapur Milk Production News : दुधाचा उत्पादन खर्च बत्तीस रुपये असताना, उत्पादन खर्चाबरोबर दर देऊन दुग्ध व्यवसाय कसा टिकेल, खासगी संघ संगनमताने दर कमी करून दुग्ध व्यवसाय उद्‍ध्वस्त करीत आहेत.

त्यांना शासनाने वेळीच हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना योग्य तो दर देण्याचे काम करावे अन्यथा यापेक्षा आंदोलन अधिक तीव्र करू, असा इशारा शेतकरी संघर्ष समितीचे निमंत्रक कृषिभूषण अंकुश पडवळे यांनी शुक्रवारी (ता. २६) येथे व्यक्त केले.

मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथे नागपूर- रत्नागिरी हायवेवर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. त्या वेळी पडवळे बोलत होते.

या वेळी संघर्ष समितीचे निमंत्रक प्रा, येताळा भगत, सिद्धेश्‍वर हेंबाडे, भगवान चौगुले, हिम्मत भाकरे, शिवाजी नागणे, विजय इमडे, समाधान दत्तू, अशोक लेंडवे, देविदास इंगोले, महादेव ढोणे, शहाजहान पटेल आदी उपस्थित होते.

पडवळे म्हणाले, की सध्या सोलापूर जिल्ह्यासह राज्यात उन्हाळा असतानाही व दुधाचा तुटवडा असतानाही राज्यातील खासगी व सहकारी दूध संघाने ५ ते ६ रु दर कमी केले आहेत. परंतु दूध संघानी पशुखाद्ये दर कमी केले नाहीत. तसेच चाऱ्याचे दरही वाढले आहेत.

दूध उत्पादनाचा उत्पादन खर्च वाढल्यामुळे व उन्हाळ्यात जनावरे दोन ते तीन लिटर दूध कमी देत असल्यामुळे दूध उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे. अनेक सुशिक्षित तरुण शेतकऱ्यांनी नोकरी मिळत नसल्यामुळे बँकाची कर्जे काढून दूध व्यवसाय सुरू केला.

परंतु दूध संघानी उन्हाळ्यात दूधदर कपात केल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी हैराण झाला आहे, असेही ते म्हणाले. या वेळी शिवसेनेचे नेते प्रा. येताळा भगात यांनीही दुधाला हमीभाव देण्याची मागणी केली. शिवाजीराव नागणे, बाळासाहेब यादव, बिभिषण लेंडवे व बीराप्पा मोटे यांचीही भाषणे झाली. या वेळी नायब तहसीलदार साळुंखे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

आंदोलनातील प्रमुख मागण्या

- खासगी व सहकारी संघानी उन्हाळा असतानाही व दूध तुटवडा असतानाही कमी केलेले दुधाचे दर ताबडतोब पूर्ववत करावेत.

- राज्य सरकारने दूध गुणप्रत तपासणी कमिटी जाहीर केलेल्या कमिटीने ताबडतोब आपला अहवाल शासनाला द्यावा व सदर कमिटी वर दूध उत्पादक शेतकऱ्यांची सदस्य म्हणून नेमणूक करावी.

- पशुखाद्याचे वाढलेले दर कमी करण्याबाबत शासनाने हस्तक्षेप करावा.

- गाईच्या दुधाला ४० रुपये आणि म्हशीच्या दुधाला ६५ रुपये हमीभाव जाहीर करावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT