Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Compensation : पीकविमा परतावा न मिळाल्याने संभ्रम

Crop Insurance Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच मंडलांतील शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही पीकविमा परतावा जमा न झाल्याने त्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच मंडलांतील शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही पीकविमा परतावा जमा न झाल्याने त्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात कृषी विभागाने कृषी आयुक्त कार्यालयाशी पत्रव्यवहार सुरू केला आहे.

सिंधुदुर्गात एकूण ५७ मंडल असून या मंडलातील ४२ हजार १९० शेतकऱ्यांनी १९ हजार ९११ हेक्टर क्षेत्रावरील आंबा, काजू पीक क्षेत्र सरंक्षित केले होते. दरम्यान, स्वंयचलित हवामान केंद्रानुसार जिल्ह्यातील ५६ मंडले पीकविमा परताव्यास पात्र ठरली.

मालवण तालुक्यातील आंबेरी हे एकमेव केंद्र परताव्यास पात्र ठरलेले नाही. जिल्ह्यातील ५६ मंडलांतील शेतकऱ्यांना ६७ कोटी ९४ लाख सुरुवातीला परतावा मंजूर झाला. त्यानंतर त्यात सुधारणा होत आणखी काजू पिकासाठी वगळलेल्या मंडलांना पीकविमा परतावा देय असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यामध्ये सुमारे दोन कोटी रुपयांची रक्कम वाढली.

दरम्यान, जिल्ह्यातील ५६ पैकी ५१ मंडलातील आंबा, काजू बागायतदारांच्या खात्यात मागील दहा बारा दिवसांपासून पीकविमा परतावा जमा होण्यास सुरुवात होऊन तो बहुतांशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे.

परंतु जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील सावंतवाडी, निरवडे, कुडाळ तालुक्यातील गोठोस, ओरोस बुद्रुक, दोडामार्ग तालुक्यातील तळकट अशा एकूण पाच मंडलातील शेतकऱ्यांना विमा परतावा आजमितीस मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात कृषी विभागाने कृषी आयुक्त कार्यालयाशी पत्रव्यवहार सुरू केला आहे.

मी तळकट आंबा पिकाचे विमाचे क्षेत्र सरंक्षित केले होते. परंतु अजूनही मला परतावा मिळालेला नाही. नवीन हंगामाची रक्कम भरण्याची मुदत जवळ आली आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पीकविमा परतावा जमा करावा.
अजय देसाई,आंबा-काजू बागायतदार, तळकट

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT