Farmer with Digital ID  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer ID : सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांमध्ये ‘फार्मर आयडी’वरून संभ्रम

Agriculture Scheme : विविध हेतुने शासनाने शेतकऱ्यांना मोफत फार्मर आयडी देण्याचे जाहीर केले असले तरी विविध सामूहिक सुविधा केंद्र (सीएससी) केंद्रधारक शेतकऱ्यांकडून रक्कम उकळत आहेत.

Team Agrowon

Sindhudurg News : विविध हेतुने शासनाने शेतकऱ्यांना मोफत फार्मर आयडी देण्याचे जाहीर केले असले तरी विविध सामूहिक सुविधा केंद्र (सीएससी) केंद्रधारक शेतकऱ्यांकडून रक्कम उकळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शासनाने शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी बनविण्याची योजना आणली आहे. या योजनेचे विविध हेतू असून शेतकरी व त्यांच्या शेतजमिनीची ओळख पटविणे, पिकवीत असलेल्या पिकांची निश्चिती होणे.कर्जवितरणात सुलभता यावी, असे अनेक हेतू त्यामध्ये आहेत.

या शेतकरी आयडीमुळे पीएम किसान योजना, पीकविमा योजना, किसान क्रेडीट कार्ड यासह विविध फायदे शेतकऱ्यांना होणार असल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले असून हे आयडी कार्ड सीएससी सेंटरवर मोफत काढून दिले जाणार आहे.

या सेंटरधारकांना शासनाकडून १५ रुपये दिले जाणार आहेत. मात्र सिंधुदुर्गात काही सेंटरवर शेतकऱ्यांनाकडून रक्कम घेतली जात आहे. त्यामुळे हे फार्मर आयडी नक्की शासन मोफत देतेय का? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.

अर्ज भरणाऱ्या सेंटरधारकाला शासनाकडून १५ रुपये देण्यात येणार आहेत. त्यामुळे कोणीही शेतकऱ्यांनी रक्कम भरू नये. असे प्रकार सुरू असतील तर प्रशासनाशी संपर्क साधावा.
- सूर्यकांत पाटील, तहसीलदार, वैभववाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT