Child Marriage  Agrowon
ॲग्रो विशेष

Child Marriage : बालविवाह प्रतिबंधक मोहीम गावनिहाय राबवा

Child Marriage Act : सर्व विभागांच्या समन्वयाने बालविवाह प्रतिबंध मोहीम गावागावात राबवावी, असे निर्देश जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना यांनी मंगळवारी (ता. ७) झालेल्या आढावा बैठकीत दिले.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : सर्व विभागांच्या समन्वयाने बालविवाह प्रतिबंध मोहीम गावागावात राबवावी, असे निर्देश जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना यांनी मंगळवारी (ता. ७) झालेल्या आढावा बैठकीत दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीस अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य) मधुकर देशमुख, पोलीस निरीक्षक गुरमे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी महादेव डोंगरे, जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.

बैठकीतील माहितीनुसार महिला व बाल विकास विभाग अंतर्गत बालविवाह प्रतिबंधक कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. एप्रिल २०२३ ते ऑक्टोबर २०२३ दरम्यान जिल्हा बालसंरक्षण कक्षाने कारवाई करुन २७ बालविवाह रोखले आहेत. त्यात छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ८, पैठण ८, गंगापूर ५, वैजापूर, कन्नड, फुलंब्री आणि सिल्लोड येथे प्रत्येकी एक असे एकूण २७ बालविवाह रोखले आहेत.

या कारवाईतील बालिकांचे शिक्षण, पुनर्वसन या साठी उपाययोजना करण्यात आल्याचेही बैठकीत सांगण्यात आले. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना म्हणाले, की कमी वयात बालविवाह केल्यामुळे बालकांच्या आरोग्यावर तसेच भावी पिढीवर दूरगामी परिणाम होतात.

हे दुष्परिणाम टाळण्यासाठी शाळा व ग्रामपंचायत पातळीवर बालविवाह रोखण्यासाठी पालकांचे समुपदेशन आणि जाणीव जागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जावे. पंचायत समितीमध्ये पथनाट्य, चित्रफिती, माहितीपटाच्या माध्यमातून जागृती करावी, असे निर्देश त्यांनी दिले. बालविवाहासंदर्भात वा बालकांच्या हक्कांचे हनन होत असल्यास टोल फ्री क्रमांक १०९८ व ११२ वर तक्रार द्यावी, असे आवाहन ही त्यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: कापसाचा वाढलेला भाव टिकून; हरभरा आवक वाढली, तूर दबावातच, सरकीचे दर टिकून तर पपईला मागणी

Weather Update in Maharashtra : मराठवाड्यात गारपीटीचा इशारा; कोकण, मध्यम महाराष्ट्रासह विदर्भात पावसाचा अंदाज

Agriculture AI: ‘एआय’ तंत्रज्ञानातून कमी खर्चात सुरू उसाचे एकरी १०४ टन उत्पादन

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्ग बदलण्याचे श्रेय शेतकरी संघर्ष समितीला

Honoring Women Farmers: सन्मान महिलाशक्तीचा...

SCROLL FOR NEXT