Banana  Agrowon
ॲग्रो विशेष

Cloudy Weather : ढगाळ वातावरणाने चिंता

Agriculture Weather : खानदेशात मागील दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. केळी, कलिंगड व इतर फळे, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांमध्ये पाऊस व नुकसानीची भीती आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात मागील दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. केळी, कलिंगड व इतर फळे, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांमध्ये पाऊस व नुकसानीची भीती आहे. निरभ्र वातावरणाची आळवणी शेतकरी करीत आहेत.

खानदेशात यंदा थंडी कमी असल्याने किमान तापमान एक दिवसही सात अंश सेल्सिअसपर्यंत गेलेले नाही. सातपुड्यातही थंडीचे आगमन यंदा हवे तसे झालेले नाही. अनेकदा डिसेंबरच्या अखेरीस किंवा जानेवारीत सातपुड्यात दवबिंदू गोठविणारी थंडी असते. अक्कलकुव्यातील दाब व परिसरात किमान तापमान दोन अंश सेल्सिअसखाली पोचते. परंतु यंदा कुठेही हुडहुडी भरविणारी थंडी नाही. यातच ढगाळ वातावरण सतत तयार होत आहे.

नोव्हेंबरच्या शेवटच्या आठ-नऊ दिवसांत सतत ढगाळ व पावसाळी वातावरण होते. नंदुरबारातील २५ महसूल मंडलांत त्या वेळेस अतिवृष्टी झाली. जळगाव व धुळ्यातही अनेक भागात पाऊस झाला होता. नंदुरबारात काही भागात वादळ व गारपिटीने हानी झाली. यानंतर डिसेंबरमध्ये काही दिवस निरभ्र वातावरण होते.

परंतु अधूनमधून ढगाळ वातावरण तयार होतच राहिले. यामुळे थंडीला अडथळा आला. रब्बी हंगामात गहू, हरभरा, दादर ज्वारी व इतर पिकांसाठी थंडी आवश्यक आहे. परंतु यंदा सलग चार, पाच दिवस किमान तापमान ९-१० अंश सेल्सिअसखाली आलेच नाही. यामुळे रब्बी हंगाम हवा तसा नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

केळी, पपईची काढणी सुरू आहे. अनेकांची केळी निसवणीवर आहे. कलिंगड, कारली, गिलके, खरबूज आदी वेलवर्गीय पिकांची लागवडदेखील झाली आहे. यंदा कलिंगडाची लागवडदेखील अनेक भागांत प्रतिकूल स्थितीमुळे कमी झाली आहे. परंतु काही शेतकऱ्यांनी हिमतीने लागवड करून पीक वाढविले आहे.

सकाळपासून सुसाट वारे

खानदेशात मागील दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असते. दुपारी सुसाट वारा सुटतो. पहाटेदेखील वारा असतो. यामुळे शेतकरी निरभ्र वातावरणाची आळवणी, प्रतीक्षा करीत आहेत. निरभ्र वातावरणात थंडीही वाढेल व पिकांवरही प्रतिकूल परिणाम कमी होतो, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT