Computer Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Worker : ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी संगणक भेट

जिल्हा परिषदेच्या शाळा इतके उत्कृष्ट नियोजन व आयोजन करू शकतात हे मी प्रथमच पाहत आहे.

Team Agrowon

Nagar News : ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींना संगणक शिकता यावे यासाठी भारजवाडी (ता. पाथर्डी) या दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेला (Zilha parishad School) शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरिअल फाउंडेशन व निरंजन सेवा भावी संस्थेकडून सोलर पॅनेलसह संगणक संचाची भेट देण्यात आली.

शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरिअल फाउंडेशनचे अध्यक्ष उद्योजक नरेंद्र फिरोदिया व निरंजन सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अतुल डागा यांच्या हस्ते सोलर पॅनेल व संगणक संचाचे उद्‍घाटन करण्यात आले.

भारजवाडी (हनुमाननगर, ता. पाथर्डी) येथील शाळेत मंगळवारी (ता. २८) झालेल्या कार्यक्रमाला सर्पराज्ञी प्रकल्पाचे संचालक सिद्धार्थ सोनवणे, बालहक्क समितीचे समीर पठाण, पत्रकार गोकूळ पवार, अंगद पानसंबळ, सतीश मुरकुटे, राघू जपकर, पांडुरंग बटुळे, किरण मणियार, स्वप्नील कुलकर्णी, मुकुंद धूत, विशाल झवर, सुहास चांडक, सुमित चांडक, प्राजक्ता डागा, सविता झंवर, कृष्णा धूत, दिनेश अपूर्वा, सरपंच माणिक बटुळे आदी उपस्थित होते.

हनुमाननगर (भारजवाडी) शाळेतील मुलांचे सुंदर हस्ताक्षर व गुणवत्ता पाहून निरंजन सेवाभावी संस्था व शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरिअल फाउंडेशन यांच्या संयुक्त मदतीतून या शाळेला सोलर पॅनेल व संगणक कक्ष देण्याचा निर्णय घेतला होता.

जिल्हा परिषदेच्या शाळा इतके उत्कृष्ट नियोजन व आयोजन करू शकतात हे मी प्रथमच पाहत आहे. शहरातील शाळांना लाजवेल असा उपक्रम येथे राबवला जात असल्याचे समाधान वाटते, असे मत नरेंद्र फिरोदिया यांनी व्यक्त केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

Bio Tech Farming : ‘के. बी. बायो’च्या वनस्पतिजन्य पीक संरक्षण तंत्रज्ञानाला मान्यता

Land Records Update: जमीन मालकी कायद्याची सिंधुदुर्गातून अंमलबजावणी

Khandesh Rain Update: खानदेशात पावसाची विश्रांती

SCROLL FOR NEXT