Crop Damage Compensation Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : अतिवृष्टीचे ३९५ कोटी रुपये ‘महाआयटी’ पोर्टलवर अपलोड

Heavy Rain Crop Loss : जिल्ह्यात यंदा सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीपोटी ५४८ कोटी ५९ लाख रुपयावर निधी मंजूर आहे.

Team Agrowon

Parbhani News : जिल्ह्यात यंदा सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीपोटी ५४८ कोटी ५९ लाख रुपयावर निधी मंजूर आहे. अर्थसहाय्याची रक्कम थेट लाभ हस्तांतर प्रणालीद्वारे ई केवायसी केलेल्या बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जात आहे.

महा आय. टी. पोर्टलवर उपलब्ध ३ लाख ३७ हजार ८५ शेतकऱ्यांना अनुदान वितरणास मंजुरी देण्यात आली आहे. पोर्टलवर ३९५ कोटी ११ लाख २ हजार ६८१ रुपये (७२.०२ टक्के) रक्कम अपलोड करून मंजुरी देण्यात आली आहे.

सप्टेंबर महिन्यात परभणी जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यातील ५ लाख २९ हजार ७६१ शेतकऱ्यांच्या ४ लाख २ हजार १२३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने ५४८ कोटी ५९ लाख ८९ हजार निधी मंजूर झाला आहे.

तलाठ्यांमार्फत बाधित शेतकऱ्यांच्या याद्या तयार केल्या जात आहेत. विशिष्ट क्रमांक प्राप्त शेतकऱ्यांनी ई केवायसी केल्यानंतर अर्थसहाय्याची रक्कम थेट बँक खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

आजवर ३ लाख ३७ हजार ८५ शेतकऱ्यांसाठी ३९५ कोटी ११ लाख २ हजार ६८१ रुपये एवढी रक्कम महा आय. टी. पोर्टलवर अपलोड करण्यात आली असून १५३ कोटी ४८ लाख ८६ हजार ५३१ रुपये रक्कम पोर्टलवर अपलोड करण्याचे बाकी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT