Dharangaon Market Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Procurement : गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर नव्या हंगामातील कापूस खरेदीचा शुभारंभ ; धरणगावमध्ये मिळाला 'एवढा' भाव

Cotton Rate : चालू हंगामातील कापूस खरेदीलासुरुवात झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील श्री जी जिनिंगमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते कापसाची खरेदी सुरु करण्यात आली.

Swapnil Shinde

Cotton Season : यंदाच्या हंगामातील कापूस खरेदीला जळगाव जिल्ह्यात शुभारंभ झाला आहे. ग्रामीण पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धरणगाव येथील श्री जी जिनिंगमध्ये कापसाच्या खरेदीला सुरुवात झाली आहे. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर नव्या हंगामातील कापसाला ७ हजार ५३ रुपयांचा दर मिळाला आहे.

'ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

मागील हंगामामध्ये राज्यात कापूसाचे चांगले उत्पादन (Cotton production) झाले. मात्र, दर पडल्याने कापसाची विक्री न करता शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याचा मोठा फटका कापूस जिनींग उद्योगाला बसला आहे. दरम्यान, यावर्षीच्या हंगामातील कापसाची (Cotton) खरेदीला सुरुवात झाली आहे.

जळगाव जिल्ह्यात धरणगाव येथे श्री जी जिनिंग येथे कापूस खरेदीचा शुभारंभ मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाला. कापूस खरेदीदारांनी सावध पावले टाकत नव्या हंगामातील कापसाला ७ हजार ५३ रुपयांचा दर मिळाला आहे. तर जुन्या कापसाला ७ हजार ६०० रुपयांचा दर मिळाला आहे.

मागील वर्षी कापसाचे भाव 15 हजारावर पोहोचले होते. पण त्यानंतर दरामध्ये मोठी पडझड झाली. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आगामी काळात भाव वाढतील, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस घरातच ठेवला. दरम्यान, यंदा राज्यातील बहुतांश भागात पावसाने ओढ दिल्याने त्याचा परिणाम पिकावर होत आहे.

त्यामुळे यंदा उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यंदाच्या हंगामातील नवीन कापसाची आवक सुरू झाली आहे. पण खरेददारांकडून नव्या कापसामध्ये आद्रता जास्त असल्याने हे दर कमी असल्याचे सांगितले जात आहे. कापूस उत्पादन खर्च पाहता किमान १० हजार रुपयांच्यावर हे दर असायला पाहिजे अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT