Seed Bank In Nagar Agrowon
ॲग्रो विशेष

Seed Bank In Nagar : कोंभाळणेतील बीज बॅंकेला जिल्हाधिकारी सालीमठ यांची भेट

अकोले तालुक्यातील कोंभाळणे येथील बीजमाता राहीबाई सोमा पोपेरे यांच्या मार्गदर्शनाने उभ्या राहिलेल्या देशातील पहिल्या देशी बियाणे बँकेला जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी नुकतीच भेट दिली.

Team Agrowon

Nagar News : अकोले तालुक्यातील कोंभाळणे येथील बीजमाता राहीबाई सोमा पोपेरे (Rahibai Soma Popere) यांच्या मार्गदर्शनाने उभ्या राहिलेल्या देशातील पहिल्या देशी बियाणे बँकेला जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी नुकतीच भेट दिली. या वेळी त्यांनी राहीबाई जिल्ह्याला लाभलेले वरदान आहे, असे गौरवोद्‌गार काढले.

जिल्हाधिकारी सालीमठ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच आदिवासी भागाचा दौरा केला. त्यांच्या समवेत प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, बायफचे विभागीय अधिकारी जितीन साठे उपस्थित होते.

देशी बियांच्या संवर्धनासाठी देश आणि विदेशात प्रसिद्ध असलेल्या बीजमाता राहीबाई पोपेरे यांची भेट घेऊन या विषयाची सविस्तर माहिती यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. राहीबाई यांचे पारंपरिक बियाणेसंवर्धनातील ज्ञान व अभ्यास पाहून त्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले.

अहमदनगर जिल्ह्यातील आदिवासी अतिदुर्गम भागात अशा पद्धतीचे काम उभे राहिल्याचे समाधान सालीमठ यांनी व्यक्त केले. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत या विषयाचे ज्ञान पोहोचावे, यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

राहीबाई यांनी जतन केलेल्या विविध गावरान वाणांची तंत्रशुद्ध माहिती आपणास प्रेरणा देऊन गेली. जिल्ह्यात काम करताना या ज्ञानाचा उपयोग होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

राहीबाईंनी कळसूबाई बियाणेसंवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी व प्रांताधिकाऱ्यांचा सत्कार केला. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत देशी वाण पोहोचविण्याचा मानस राहीबाई यांनी या वेळी व्यक्त केला.

जिल्हाधिकाऱ्यांना बियाणे संच भेट

राहीबाईंनी जतन केलेल्या विविध वाणांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. त्यांच्या संग्रही असलेले भाजीपाला बियांचे संच या वेळी त्यांनी त्यांना भेट दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT