Stone picker Machine Agrowon
ॲग्रो विशेष

Stone Picker Machine : शेतातील दगड गोटे गोळा करणं 'स्टोन पिकर'मुळं झालं सोपं

Maharashtra Dry Areas : राज्यात डोंगराळ आणि कोरडवाहू भाग मोठ्या प्रमाणात आहे. राज्यातील शेतकऱ्यांना त्यामुळे दगड गोट्याची समस्या जाणवते.

Team Agrowon

Agriculture Mechanization : राज्यात डोंगराळ आणि कोरडवाहू भाग मोठ्या प्रमाणात आहे. राज्यातील शेतकऱ्यांना त्यामुळे दगड गोट्याची समस्या जाणवते. शेतीची मशागत करताना दगड गोटे अडथळे निर्माण करतात. त्यामुळे दगड गोटे शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरतात.

या दगड गोट्याची वेचणी करण्याचं काम देखील कटकटचं असतं. त्यामुळे शेतकरी हैराण असतात. यावर उपाय तंत्रज्ञानाच्या मदतीने उपाय शोधण्यात आला आहे. तो म्हणजे स्टोन पिकर यंत्राचा.

स्टोन पिकर म्हणजे काय?

स्टोन पिकर असं यंत्र आहे ज्याच्या माध्यमातून शेतातील दगड गोटे वेचता येतात. हे छोटं यंत्र शेतातले दगड वेचून घेतं. त्यामुळे शेताच्या मशागतीमध्ये अडचण येत नाही.

दगड गोट्याची समस्या

शेतकऱ्यांना पेरणी करायची असो वा मशागत अनेकदा अवजारांच्या मधे दगड गोटे येऊन यंत्र तुटतात. अशावेळी दगड गोट्यामुळे शेतीकामात अडथळा येतो. तसेच दगड गोट्याचं प्रमाण अधिक असलेल्या शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट येते. त्यामुळे दगड गोटे वेचून बाहेर काढणे महत्त्वाचे आहे.

स्टोन पिकरची क्षमता

स्टोन पिकर ट्रॅक्टरला जोडून काम करता येते. स्टोन पिकर एक एकर क्षेत्रातील दगड वेचणी करण्याचं काम अवघ्या एक तासात करते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात आणि वेळेत बचत होते. आणि उत्पादनात वाढ होण्याची शक्यताही वाढते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi 2026 Sowing : रब्बी हंगामासाठी केंद्र सरकारचे १ हजार ७७७ लाख टन उत्पादनाचे उद्दिष्ट; पावसाच्या तुटीमुळे चिंता वाढली

White Grub Control: उसातील हुमणीचे एकात्मिक नियंत्रण

Interview With Prataprao Pawar: दुष्काळातही ‘एआय’ ठरेल फायदेशीर

Cotton Crop Disease: रोगांची लक्षणे ओळखा, वेळीच नियंत्रण करा

Cotton Pest Management: सद्यःस्थितीत कपाशीवर आढळणाऱ्या किडींचे एकात्मिक व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT