Maharashtra Cold  Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Cold : राज्यात गारठा कायम राहणार

Cold Season : उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात थंडी वाढली आहे. उत्तर महाराष्ट्र तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली असला तरी उर्वरित राज्यात किमान तापमानात काहीशी वाढ झाली आहे.

Team Agrowon

Pune Weather Update : उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात थंडी वाढली आहे. उत्तर महाराष्ट्र तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली असला तरी उर्वरित राज्यात किमान तापमानात काहीशी वाढ झाली आहे. आज (ता. १८) किमान तापमानात वाढ होणार असली तरी गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम असून, बुधवारी (ता. १७) पंजाबच्या अमृतसर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी २ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.

पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तराखंड, उत्तर प्रदेशमध्ये धुक्याचे साम्राज्य कायम आहे. पंजाब, हरियाना, चंदीगड, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तरप्रदेशात थंडीच्या लाटेबरोबर थंड दिवस अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे.

राज्यात थंडी वाढली असून, धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ९.२ तर जळगाव येथे ९.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यात किमान तापमानाचा पारा ११ ते १६ अंशांच्या दरम्यान आहे. राज्यात किमान तापमानात काहीशी वाढ होण्याची शक्यता असून, गारठा कायम राहण्याचा हवामान विभागाने वर्तविला आहे.

बुधवारी (ता. १७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :
पुणे ३२.९ (१२.०), नगर २९.९ (११.७), धुळे २९.० (८.०), जळगाव (९.३), कोल्हापूर ३१.२ (१७.०), महाबळेश्वर २५.८ (१४.०), नाशिक ३०.७ (११.५), निफाड २९.१ (९.२), सांगली ३१.६ (१६.६), सातारा ३२.३ (१३.०), सोलापूर ३४.० (१५.८), सांताक्रूझ २९.२ (१७.३), डहाणू २७.१ (१५.६), रत्नागिरी ३०.२ (१८.२), छत्रपती संभाजीनगर २९.२ (११.६), नांदेड ३१.८ (१६.०), परभणी ३१.२ (१५.५), अकोला ३०.८ (१३.६), अमरावती २९.८ (१३.५), बुलडाणा २९.८ (११.५), ब्रह्मपुरी ३१.२ (१८.०), चंद्रपूर ३१.६ (१५.४), गडचिरोली २९.२ (१३.८), गोंदिया २८.६ (१४.८), नागपूर २९.७ (१५.०), वर्धा ३०.५ (१४.५), वाशीम ३१.७ (१३.२), यवतमाळ ३१.५ (१४.५).

१० अंशांपेक्षा कमी किमान तापमान असलेली ठिकाणे :
धुळे ८, निफाड ९.२, जळगाव ९.३.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gram Sowing : खानदेशात हरभरा पेरा स्थिर राहण्याचे संकेत

BBF Technology : बीबीएफ तंत्रज्ञान उपयुक्त : डॉ. मायी

Crop Subsidy : कोरडवाहू पिकांसाठी हेक्टरी ३० हजार, बागायतीसाठी ७० हजार रुपये अनुदान द्या

Farmer Crisis : करपलेल्या ४० एकर सोयाबीनवर फिरवला नांगर

Sugarcane Crushing Season: दुष्काळात उसासाठी कारखान्यांची चढाओढ

SCROLL FOR NEXT