Weather Update Cold Wave agrowon
ॲग्रो विशेष

Weather Update Cold Wave : थंडीचा जोर वाढला, पुढचे २४ तास महत्वाचे; हवामान विभागाची अपडेट

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील काही भागातही थंडीचा जोर वाढला आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे तुरळक पावसाची शक्यता आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Cold Wave : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या दोन दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. दिवसभर गार वारे आणि सकाळी ९ पर्यंत धुके पडत असल्याने तापमानात कमालीची घट झाली आहे. मागच्या २४ तासांपासून पडत असलेल्या थंडीमुळे कोल्हापूर जिल्ह्याचे तापमान १२ अंशावर आले आहे.

दरम्यान पुढचे दोन दिवस अशीच थंडी राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

रक्त गोठवणाऱ्या थंडीचा अनुभव कोल्हापूरकरांना घेता येत आहे. जिल्ह्याचा पारा १२ डिग्रीपर्यंत खाली आल्याने कडाका वाढला आहे. याचबरोबर महाराष्ट्रातील काही भागातही थंडीचा जोर वाढला आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे तुरळक पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

नाशिक, उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर राहणार आहे तर विदर्भातील काही भागात पावसाचे सावट असल्याचे बोलले जात आहे.

उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे. दाट धुक्यामुळे आणि कडाक्याच्या थंडीमुळे दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश येथे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर बांगलादेशवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रासह काश्मीर खोऱ्यात पावसाची शक्यता आहे. गेल्या काही आठवड्यापासून महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात कडाक्याची थंडी आहे.

राज्यात अंशतः ढगाळ हवामान असले, तरी राज्याच्या किमान तापमानात घट झाल्याने दिसून येत आहे. पारा घसरल्याने उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी वाढली आहे. निफाड, धुळे, जळगाव येथे पारा १० अंशांच्या खाली घसरला आहे. आज (ता. २४) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT