Cold Storage Agrowon
ॲग्रो विशेष

Cold Chain Subsidy : शीतसाखळी तंत्रज्ञान योजनेच्या अनुदानात वाढ

Horticulture Scheme : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शीत साखळी तंत्रज्ञानाकरिता या वर्षी अनुदानाच्या रकमेमध्ये वाढ झाली आहे.

Team Agrowon

Pune News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शीत साखळी तंत्रज्ञानाकरिता या वर्षी अनुदानाच्या रकमेमध्ये वाढ झाली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन राज्याचे फलोत्पादन विभागाचे संचालक कैलास मोते यांनी केले.  

आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ व न्यू लीफ डायनामिक टेक्नॉलॉजीज यांच्या संयुक्त विद्यमाने तीनदिवसीय ‘शीतसाखळी तंत्रज्ञानाचा वापर करून काढणीपश्‍चात तंत्रज्ञान’ या ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी (ता.६) केले होते.

कार्यक्रमाचे उद्‍घा‍टन महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकारे आणि न्यू लिफ्ट डायनामिक टेक्नॉलॉजीचे व्यवस्थापकीय संचालक आकाश अग्रवाल यांच्या हस्ते झाले.

या वेळी महाराष्ट्र राज्याचे फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते, राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाचे प्रकल्प संचालक वैभव शिंदे आदी उपस्थित होते. प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक  डॉ. प्रकाश सानप, डॉ. सुरेश पतंगे, अमोल साळगावकर, सागर बेंद्रे, डॉ. पराग जाधव, सुरेश तुरकमारे व कारभारी मांगटे यांनी विविध विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

‘शीत साखळी तंत्रज्ञान ही काळाची गरज’

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकारे म्हणाले, की भारतामध्ये फळे व भाजीपाला यांचे नुकसान व्यवस्थित साठवणूक पद्धती नसल्यामुळे होत आहे. त्यामुळेच भविष्यामध्ये शीत साखळी तंत्रज्ञान ही काळाची गरज असून शेतकऱ्यांनी याकडे वळणे गरजेचे आहे. त्यासाठी कृषी विभागाच्या फलोत्पादन विभागाशी संपर्क साधावा. कार्यक्रमात महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे दिगंबर साबळे व हेमंत जगताप यांचे सहकार्य लाभले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT