Sugarcane Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Factory : साखर उताऱ्यात सहकारी कारखान्यांची आघाडी

Sugarcane Season : गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यातील सहकारी व खासगी १७ साखर कारखान्यांनी ७२ लाख ८८ हजार ७२० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. आतापर्यंत ७२ लाख २४ हजार ५२६ टन उसाचे गाळप झाले आहे.

Team Agrowon

Satara News : गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यातील सहकारी व खासगी १७ साखर कारखान्यांनी ७२ लाख ८८ हजार ७२० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. आतापर्यंत ७२ लाख २४ हजार ५२६ टन उसाचे गाळप झाले आहे.

साखर उताऱ्यात सहकारी कारखान्यांची आघाडी कायम असून हंगाम अंतिम टप्प्यात येऊन खासगी कारखान्यांचा साखर उताऱ्यात घट होत आहे. अनेक कारखान्यांची तोडणी यंत्रणा विस्कळीत असल्याने मार्चअखेर गाळप सुरू राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

जिल्ह्यातील ऊस गाळप हंगामाचे तीन महिने पूर्ण झाले आहेत. एकूण १७ कारखान्यांकडून गाळप सुरू असून यामध्ये सहकारी नऊ व खासगी आठ कारखान्यांचा समावेश आहे. हंगाम अंतिम टप्प्यात येऊन खासगी कारखान्यांचा साखर उताऱ्यात सुधारणा झालेली नाही.

सध्या खासगी कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ८.९९ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. आतापर्यंत १७ साखर कारखान्यांनी ७२ लाख २४ हजार ५२६ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ७२ लाख ८८ हजार क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. खासगी कारखान्यांच्या तुलनेत सहकारी कराखान्यांस चांगला साखर उतारा मिळत आहे.

सहकारी साखर कारखान्यांना सर्वाधिक सरासरी ११.१ टक्के साखर उतारा मिळाला आहे. सहकारी साखर कारखान्यांना मिळणारा चांगला साखर उतारा पाहता शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळणार आहेत. खासगी साखर कारखान्यांना या वेळेस कमी प्रमाणात साखर उतारा मिळत आहे, पण त्यांनाही सहकारी कारखान्यांप्रमाणेच दर द्यावा लागणार आहे.

गाळप व साखर निर्मितीत कृष्णा कारखान्याने आघाडी घेतली आहे. या कारखान्याने सर्वाधिक १० लाख १३ हजार ८५० टन उसाचे गाळपाद्वारे १० लाख ७७ हजार ६० क्विंटल साखर निर्मिती केली आहे. या हंगामात अनेक कारखान्यांची तोडणी, वाहतूक यंत्रणा विस्कळीत झाल्याने गाळपावर परिमाण होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Road Development: मुख्यमंत्री बळीराजा योजनेत १५२ शेतरस्त्यांचे प्रस्ताव

Calf Care in Summer: उन्हाळ्यात वासरांची घ्या खास काळजी; उष्माघातापासून करा बचाव

Illegal Cotton Seeds: अवैध कापूस बियाणे विक्रीवर कारवाई

Rural Water Crisis: गादेगावच्या नागरिकांचा घागर मोर्चा

Sawantwadi Rain Damage: सावंतवाडीला वादळाचा तडाखा

SCROLL FOR NEXT