Banana Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Cultivation : खानदेशात मे, जूनमध्ये केळी लागवड कमी

Banana Plantation : जुलैत केळी लागवडीचे नियोजन अनेकांनी केले आहे. कमाल शेतकऱ्यांनी आगाप मृग बहर बागांची लागवड केली आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : जूनमध्ये लागवडीच्या केळी रोपांवर पुढे कुकुंबर मोझॅक विषाणू (सीएमव्ही) येत असल्याच्या भीतीने जूनमधील केळी रोपांची लागवड खानदेशात अल्प आहे. तसेच अनेकांनी मे व जूनमध्येही केळी रोपांसह कंद लागवड टाळली आहे.

जुलैत केळी लागवडीचे नियोजन अनेकांनी केले आहे. कमाल शेतकऱ्यांनी आगाप मृग बहर बागांची लागवड केली आहे. पण मृग नक्षत्रात केळी लागवड मात्र अल्प दिसत आहे. मे व जूनमध्ये केळी कंद लागवड केल्यास या बागांतील केळी मे, जूनमध्ये काढणीस येते. या कालावधीत बाजारात आंबा फळ असते.

तसेच उष्णता, वादळी पाऊस, विजेची समस्याही असते. तसेच जूनमध्ये उतिसंवर्धित केळी रोपांची लागवड केल्यास या बागांत पुढे सीएमव्ही रोग येण्याचा धोका असतो, असे शेतकरी मानतात. यामुळे खानदेशात मे व जूनमध्ये केळी कंद व रोपांची लागवड अल्प दिसत आहे.

अनेकांनी मार्च व एप्रिलमध्येच केळीची लागवड केली आहे. तसेच अनेकांनी जुलै व ऑगस्टमध्ये केळी कंद व रोपे लागवडीचे नियोजन केले आहे. मे व जूनमध्ये खानदेशात मिळून सुमारे १० हजार हेक्टरवर केळी लागवड झाली आहे. जुलैत मात्र ही लागवड २५ हजार हेक्टरपेक्षा अधिक राहील, असेही संकेत आहेत.

पावसाचा लाभ

जुलैत केळी लागवड केल्यास पावसाने सिंचनासंबंधी फारशी पळापळ होत नाही. खते देण्यासाठी फक्त सिंचन करावे लागते. या कालावधीत केळी वाढीसाठी अनुकूल वातावरण राहते. यामुळे केळीची चांगली वाढ होते. मे मध्ये लागवडीच्या केळीला सिंचनासंबंधी काटेकोर कार्यवाही करावी लागते. उष्णतेमुळे खतांसह आळवणीचे काम करताना सायंकाळी व पहाटेच शेतात जावे लागते.

यात मजूर व्यवस्थापन करताना नाकीनऊ येतात. यामुळेदेखील अनेकांनी मे मध्ये केळी लागवड टाळल्याची माहिती आहे. खानदेशात मृग बहर केळी लागवड अधिक असायची. पण अलीकडील दोन तीन वर्षांत या कालावधीमधील केळी लागवड घटली आहे. या कालावधी ऐवजी मार्च व एप्रिल आणि जुलै व ऑगस्टमध्ये केळी लागवड अधिक होत आहे. यामुळे मृग बहर कालावधी ऐवजी आगाप बागा व उशिराच्या बागा, असे या बागांना म्हटले जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT