Weather News  Agrowon
ॲग्रो विशेष

Weather Update : पुणे जिल्ह्यात ढगाळ वातावरण

Weather News : हवामान विभागाने पावसाचा अंदाज दिल्यानंतर राज्यासह पुणे जिल्ह्यात शुक्रवारी (ता.१०) दिवसभर ऊन व ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू होता.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : हवामान विभागाने पावसाचा अंदाज दिल्यानंतर राज्यासह पुणे जिल्ह्यात शुक्रवारी (ता.१०) दिवसभर ऊन व ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू होता. यामुळे कमाल तापमानात घट झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.

पुणे शहरासह उपनगरात गुरुवारी (ता.९) अनेक ठिकाणी पाऊस पडला. तर, काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडे पडझडीच्या घटना घडल्या होत्या. शुक्रवारी (ता.१०) सकाळी ८ वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, एनडीए येथे १८.५ मिलिमीटर, तर लोहगाव १.०, कोरेगाव ०.५, शिवाजीनगर ०.५, लव्हळे ०.५ मिलिमीटर मॉन्सूनपूर्व पाऊस पडल्याची नोंद झाली. पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा तयार झाला होता.

आठवड्याच्या सुरुवातीलाच पुण्यातील उन्हाच्या पाऱ्याने उच्चांक गाठला होता. तब्बल ४३.५ अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमान गेल्याने अंगाची लाहीलाही झाली होती. अशा परिस्थितीत नागरिक घराबाहेर पडेनासे झाले होते.

मात्र, हवामानातील बदलामुळे दोन दिवसांपासून शहरांसह जिल्ह्यातील सर्वच भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे हवेतील गारवा वाढला असून, परिणामी कमाल व किमान तापमानात एक ते दोन अंशांनी घट झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या आठवड्यात ४३ अंशांवर पोहचेलेले कमाल तापमान दोन दिवसानंतर ४० अंशांपर्यंत खाली आले आहे, तर शहराच्या बहुतांश भागातील कमाल तापमान ३९ अंशांच्या खाली गेल्यामुळे उन्हाचा चटका कमी झाला आहे.

मात्र, उकाडा वाढला असून, रात्री हवेत गारवा असल्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळत आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरात आकाश निरभ्र राहील. दुपारनंतर आकाश ढगाळ, तर काही भागात मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरी पडतील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या केंद्रावरील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

तळेगाव ढमढेरे ४२.८, शिरूर ४०.६, राजगुरुनगर ३९.८, वडगावशेरी ४०.६, पुरंदर ४०.४, हडपसर ३८.२,कोरेगाव पार्क ४०.७, चिंचवड ३९.२, खेड ३९.०, मगरपट्टा ३९.९, लव्हळे ४०.०, इंदापूर ४०.३, एनडीए ३८.७, दौंड ३९.१, शिवाजीनगर ३९.३, तळेगाव ३७.८, बारामती ३९.८, पाषाण ३८.८, आंबेगाव ३८.६, बल्लाळवाडी ३९.९, हवेली ३७.५, दापोडी ३८.०, नारायणगाव ३८.३, माळीण ३५.९, भोर ३५.७, लोणावळा ३४.२, गिरीवन ३६.५, निमगिरी ३५.२, लवासा ३४.४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT