Climate Change Agrowon
ॲग्रो विशेष

Climate Change : हवामान बदलास पूरक शेती पद्धतीचा अवलंब करावा

शेतकऱ्यांनी हवामान बदलास अनुकूल असणाऱ्या पीक पद्धतीचा अवलंब करून आर्थिक स्थैर्य मिळवावे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : शेतकऱ्यांनी हवामान बदलास (Climate Change) अनुकूल असणाऱ्या पीक पद्धतीचा अवलंब करून आर्थिक स्थैर्य मिळवावे.

तसेच शेती आधारित उद्योगामध्ये महिलांचा सहभाग वाढवावा त्या करिता एमजीएम कृषी विज्ञान केंद्राचे संपूर्ण सहकार्य असेल असे मत एमजीएम हिल्सचे (MGM Hills) संचालक सुदाम पवार यांनी व्यक्त केले.

पळसवाडी ता. खुलताबाद येथे शेती दिनाचे निमित्ताने एमजीएम हिल्सचे संचालक सुदाम पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

साहेबराव ढेंगळे यांचे शेतावर मिरची पिकात काळ्या चंदेरी मल्चिंगचा वापर, माती परीक्षण आधारित जस्ताचा गहू पिकामध्ये वापर असलेल्या प्रात्यक्षिक क्षेत्रावर शेतीदिनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी शेतकऱ्यांनी प्रयोगा संदर्भात अनुभव कथन केले.

जस्त वापरामुळे दाना भरण्यास तसेच ओंबी गळन होत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. प्रयोगाचे निष्कर्षानुसार एकरी १२ टक्के उत्पादन वाढ झाल्याचे विषय विशेषज्ञ मृदा विज्ञान स्वप्नील वाघ यांनी सांगितले.

मिरची पिकात मलचींग वापरामुळे मिरची वाढ जोमाने होत असून रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव नगण्य आहे. तण नियंत्रित होत आहे असे शेतकऱ्यांचे अनुभव आहेत.

प्रत्यक्षिकांचे निष्कर्ष सांगताना विषय विशेषज्ञ उद्यानविद्या शरद अवचट म्हणाले, की मल्चींग वापरामुळे उत्पादनात १७ ते १९ टक्के पर्यंत वाढ झाल्याचे सांगितले. कार्यक्रमास पळसवाडी व वेरुळ परीसरातील शेतकरी व महिला उपस्थित होत्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT