Assembly Monsoon Session Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Session : खतांच्या किमतीवरुन विधानसभेत खडाजंगी

Monsoon Session Day 3 : पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही विधानसभेत तिसऱ्या दिवशीही खताच्या किमंतीवरून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने काॅंग्रेसच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली.

Team Agrowon

Maharashtra Monsoon Session LIVE : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवशेनाच्या पहिल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक झाले आहे. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी खताच्या वाढलेल्या किमंतीवरून विरोधकांनी मांडलेल्या प्रश्नांना कृषीमंत्र्यांकडून समर्पक उत्तर दिले जात नसल्याने सभागृहात गोंधळ झाला.

काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किमती कमी झालेल्या असताना राज्यातही खताच्या किमती २० टक्क्यांनी कमी करणार का? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी गेल्या वर्षीच्या किमतींशी तुलना करताच विरोधकांनी आक्षेप घेतला.

केंद्र सरकारने खताचे दर न वाढवता दर स्थिती राहणार असल्याचे सांगितले. पण वास्तविक सरकारने सबसिडी देऊन शेतकऱ्याच्या जीवावर नफेखोरी केली. त्यामुळे खतांच्या किमती वाढल्या आहेत त्यावर सुद्धा उत्तर आलं नाही, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

अशोक चव्हाण यांनी सरकारवर टिका करताना केंद्राने खताच्या किमंती नियंत्रित केल्यानंतर राज्यातील खतांच्या किमंती कमी झाल्या पाहिजे. पण तसं कुठेही होताना दिसत नाही. तसेच अनेक ठिकाणी बोगस बियाणांच्या घटना होत नाही. पण त्यासदर्भात सरकारकडून कारवाई नाही. ज्यांनी बोगस बियाणांची केली त्यांच्यावर गुन्हे किती झाले. त्यांना शिक्षा झाली का? त्याची टक्केवारी किती? असा प्रश्नांचा भडिमार केला.

या प्रश्नांना उत्तर देत असताना कृषीमंत्री मुंडे यांनी बीटी कापूस कायद्याच्या धर्तीवर राज्यात बोगस बियाणांचा कायदा केला जात आहे. तो कायदा याच अधिवेशनात आणला जाणार आहोत. यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याचे विरोधकांनीने स्वागत केले पाहिजे.

खत आणि बियाण्यांबाबत सरकारच्या प्रश्नांवर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने काॅंग्रेसचे आमदार आणि कृषीमंत्र्यांमध्ये खडाजंगी झाली. यावेळी दोघेही आक्रमक झाले होते. दरम्यान, विधानसभा अध्यक्षांनी दोघांना शांत केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

Government Assistance: शेतकरी आत्महत्येची आठ प्रकरणे मदतीसाठी पात्र

Marathwada Rain Deficit: मराठवाड्यात पावसाच्या तुटीमुळे पेरणी क्षेत्रात ७ टक्क्यांची घट

Buldhana DCC Bank: बुलडाणा जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचे वर्चस्व

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT