Electricity Problem Agrowon
ॲग्रो विशेष

Electricity Issue : विजेचा लपंडाव, उकाड्याने रांजणीतील नागरिक त्रस्त

Mahavitaran Update : महावितरणकडून मागील एक महिन्यापासून विजेचा लपंडाव सुरू आहे. अनियमित भारनियमन व परिसरातील यंत्रणेच्या बिघाडाने होणाऱ्या विजेच्या लपंडावामुळे शेवगाव तालुक्यातील रांजणी येथील ग्रामस्थ वैतागले आहेत.

Team Agrowon

Shegaon News : महावितरणकडून मागील एक महिन्यापासून विजेचा लपंडाव सुरू आहे. अनियमित भारनियमन व परिसरातील यंत्रणेच्या बिघाडाने होणाऱ्या विजेच्या लपंडावामुळे शेवगाव तालुक्यातील रांजणी येथील ग्रामस्थ वैतागले आहेत. त्यातच सध्याच्या परिस्थितीत वाढत्या उकाड्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

रांजणी येथे सध्याच्या परिस्थितीत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यातच दिवसा आणि रात्रीचा वीजपुरवठा नेहमी खंडित होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत. मागील एक महिन्यापासून सलग पाच ताससुद्धा वीजपुरवठा होऊ शकलेला नाही.

दिवसभरात सतत तासन् तास वीजपुरवठा खंडित होतो. काहीतरी बिघाड होतो किंवा मुख्य केंद्राकडून वीजपुरवठा होत नाही. भेंड्याहून येणाऱ्या मुख्य वीज वाहिनीमध्ये नेहमी बिघाड झाल्याचे उत्तर ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांकडून दिले जाते.

दहिगाव-नेतील ३३ के. व्ही. विद्युत उपकेंद्रातील यंत्रणेत वारंवार होणारी बिघाड, परिसरातील वीज खांबावरील तारा तुटणे, रोहित्र जळणे, कुठे ना कुठे वीज जोडणीचे काम सुरू आदी प्रकारांमुळे वीजपुरवठा तासन्‌ तास खंडित राहत आहे.

पंधरा दिवसांपासून सिंगल फेजचा ट्रान्स्फॉर्मर नादुरुस्त झाल्यामुळे रांजणी गावात रात्रीचा विद्युत पुरवठा होत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. अनेक वर्षांपासून जीर्ण झालेले विद्युत यंत्रणेचे साहित्य नव्याने उभारण्याची आवश्यकता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ujani Floating Solar Project: उजनी जलाशयावर केवळ नऊ टक्के क्षेत्रावरच ‘फ्लोटिंग सोलार’ प्रकल्प; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे स्पष्टीकरण

Wild Boar Attack: शेतशिवारात रानडुकरांचा हैदोस; कपाशी पिकाचे नुकसान

Drought Management: बांधबंदिस्ती, जलसंधारण, पीक नियोजनानेच दुष्काळावर मात शक्य; पोपटराव पवार

Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगरला जिल्हा बॅंकेच्या दहा जागांसाठी उद्या मतदान; एकूण सत्तावीस उमेदवार; मंगळवारी मतमोजणी

Maize Trading: चांदूरबाजारमध्ये मक्याची उलाढाल वाढली

SCROLL FOR NEXT