Girna Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : गिरणा नदीतून सोडले आवर्तन

Girna Dam Irrigation : चाळीसगावनजीकच्या (जि.जळगाव) गिरणा नदीवरील गिरणा धरणातून सुमारे १०० गावांची टंचाई दूर करण्यासह काही पाणी योजनांच्या स्रोत बळकटीकरणासाठी नदीत पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे.

Team Agrowon

Jalgaon News : चाळीसगावनजीकच्या (जि.जळगाव) गिरणा नदीवरील गिरणा धरणातून सुमारे १०० गावांची टंचाई दूर करण्यासह काही पाणी योजनांच्या स्रोत बळकटीकरणासाठी नदीत पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे.

पाण्याचे आवर्तन मागील आठवड्यात नदीत सोडण्यात आले होते. हे आवर्तन चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, जळगाव, धरणगाव आदी तालुक्यांतील नदीकाठच्या गावांमधील टंचाई दूर करण्यासह काही मोठ्या गावांच्या पाणी योजनांच्या स्रोतांसाठी सोडण्यात आले आहे.

गिरणा धरण खानदेशातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प आहे. त्याची साठवण क्षमता सुमारे १८ टीएमसी एवढी आहे. मागील चार वर्षे हे धरण १०० टक्के भरले. परंतु यंदा या धरणात फक्त ५६ टक्के जलसाठा सुरुवातीला होता. यामुळे या धरणाचे पाणी यंदा पिण्याच्या पाण्यासह काही उद्योगांसाठी राखीव करण्यात आले आहे.

सुमारे २१ हजार हेक्टरवरील रब्बीसाठी यंदा या धरणातून पाणी देण्यात आलेले नाही. यामुळे भडगाव, चाळीसगाव, पाचोरा, एरंडोल, धरणगावातील मोठे शिवार यंदा कोरडे किंवा रब्बीशिवाय पडून आहे. याचा फटका या भागातील शेतकऱ्यांना बसला आहे.

या धरणातून सुमारे १०० गावांमधील टंचाई दूर करण्यासाठी दर वर्षी नदीत पाणी सोडले जाते. यंदा धरणातून नदीत टंचाई दूर करण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे. पाच वेळेस या धरणातून पाणी नदीत सोडले जाते. या पाण्यामुळे पाचोरा, भडगाव शहरातील पाणीपुरवठ्यालाही आधार होत आहे.

धरणातून कानळदा (ता.जळगाव) पर्यंत हे पाणी सोडण्यात आले आहे. पाणी कानळदा गावानजीक पोचल्यानंतर आवर्तन बंद केले जाते. हे पाणी नुकतेच कानळदा येथे पोचले होते. पाणी कानळदानजीक पोचल्यानंतर किमान दोन दिवस नदी प्रवाही असली पाहिजे, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.

कारण नदी प्रवाही राहिल्यास पाणी जिरते. त्यामुळे भूगर्भातील स्त्रोतांनाही बळकटी येते. नदीकाठच्या विहिरी, कूपनलिकांना याचा आधार होतो, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT