APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

Private APMC Ranking : चिंतामणी बाजार समिती मूल्यांकनात राज्यात अव्वल

Maharashtra APMC Ranking : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाची (स्मार्ट) अंमलबजावणी पणन संचालनालयाकडून केली जात आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Yavatmal News : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाची (स्मार्ट) अंमलबजावणी पणन संचालनालयाकडून केली जात आहे. खासगी बाजार समितीच्या झालेल्या मूल्यांकनात बाजार समित्यांचे वर्गीकरण करण्यात आले. त्यात यवतमाळ येथील चिंतामणी बाजार समिती राज्यात अव्वल ठरली. यासोबतच शेलू बुद्रुक, वणी, दत्तरामपूर या बाजार समित्याही पहिल्या चारमध्ये आल्या आहेत.

‘स्मार्ट’ या प्रकल्पाच्या माध्यमातून खासगी बाजार समित्यांचे मूल्यांकन केले जात आहे. २०२२-२३ या वर्षात बाजार समित्यांमधील उपलब्ध सोयीसुविधा, मोजमाप पद्धती, शेतीमाल लिलावासाठी असलेले लिलाव शेड, गोदाम, शेतकऱ्यांच्या नोंदी आदी सुविधांची पाहणी राज्यभरातील खासगी बाजार समित्यांत करण्यात आली होती.

बाजार समित्यांत असलेल्या सुविधांच्या आधारे बाजार समित्यांची निवड करण्यात आली. त्यात यवतमाळ येथील चिंतामणी बाजार समिती सर्व बाबतींत सरस ठरली. शेतकऱ्यांना दिलेल्या सोयीसुविधा व इतर बाबींत ही बाजार समिती सरस ठरली असून, राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

याशिवाय पुसद तालुक्यातील शेलू बुद्रुक येथील किसान मार्केट यार्ड, वणी येथील महावीर ॲग्रो, आर्णी तालुक्यातील दत्तरामूपर येथील शेतकरी कृषी खासगी बाजार समितीचे पहिल्या चारमध्ये स्थान पटकावले आहे.

शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सोयीसुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. याशिवाय शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव कसा मिळेल, या प्रयत्नात आम्ही असतो. शेतकऱ्यांना अधिक सुविधा देण्यावर भर आहे.
- विजय मुंदडा, संचालक, चिंतामणी खासगी बाजार समिती, यवतमाळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार ; टोमॅटो दर टिकून, केळीला मागणी, आल्याला उठाव तर गवारची आवक टिकून

Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती

Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

SCROLL FOR NEXT