Chilli Crop  Agrowon
ॲग्रो विशेष

Chilli Crop : जालन्यात पावसाअभावी मिरची पीक धोक्यात

Climate Change : भोकरदन तालुक्यात एकीकडे उन्हाळ्यासारखे वातावरण, दुसरीकडे रोगराईचा मारा यामुळे मिरचीचे कोवळे पीकच आता संकटात सापडले आहे.

Team Agrowon

Jalna News : भोकरदन तालुक्यात एकीकडे उन्हाळ्यासारखे वातावरण, दुसरीकडे रोगराईचा मारा यामुळे मिरचीचे कोवळे पीकच आता संकटात सापडले आहे.

आकाशाकडे नजरा लागलेले शेतकरी आता हवालदिल झाले आहेत. दरम्यान, मिरचीवर विविध कीटकनाशकांची फवारणी करण्यात शेतकरी व्यस्त आहेत.

सूर्याचा मृग नक्षत्रात गुरुवारी (ता. आठ) प्रवेश झाला. या कालावधीत पाऊस पडेल म्हणून भोकरदन तालुक्यातील जवखेडा ठोंबरीसह परिसरातील शेतशिवारात अनेक शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या पहिल्या तसेच दुसऱ्या आठवड्यात मिरची लागवड केली.

मात्र उष्णतेचा पारा मृग नक्षत्रामध्ये ही वाढल्याने लागवड केलेल्या मिरचीची रोपे जळत आहेत. त्यातच मल्चिंगवरील मिरचीला काही जण विहिरीचे पाणी देत असले तरी वातावरणात कमालीची उष्णता वाढली आहे. त्यातच दमट वातावरणामुळे मिरचीची कोवळी रोपे जळून चालली आहेत.

याशिवाय परिसरात अनेकांच्या मिरचीच्या पिकावर रोगराईचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे मिरचीच्या पिकावर औषधी फवारणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

सतत वाढते उन्हासह सुटणाऱ्या वाऱ्यामुळे शेतातील पिकांना दिलेल्या पाण्याचे बाष्पीभवनही वेगाने होत आहे. त्याचाही परिणामी पिकावर होत आहे.

यंदा परिसरात अनेक शेतकऱ्यांनी रब्बी पिके काढल्यानंतर मोकळ्या रानात मिरचीची लागवड केलेली आहे. मात्र पावसाने पाठ फिरविण्यासह रोगराईच्या प्रादुर्भावामुळे मिरचीची कोवळी रोपे जळून जात आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
राजू शेळके, ग्रामस्थ, केदारखेडा
मिरचीची लागवड केली. मात्र सध्या अनेक रोपे वाढते तापमान, रोगराईमुळे वाळून जात आहेत. शिवाय त्या ठिकाणी नवीन रोपाची लागवड केल्यास पुन्हा तसाच अनुभव येत आहे. पिकांवर कीटकनाशक फवारणीही केली आहे.
जितेंद्र वाघ, शेतकरी, जवखेडा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT