r Eknath Shinde Agrowon
ॲग्रो विशेष

Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार; शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार?

सध्या सुरू असलेल्या राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.

Team Agrowon

Crop Damage : वादळी पाऊस व गारपीटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे राज्यातील नुकसानग्रस्त भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) पाहणी करणार आहेत.

शनिवार (ता.२५) व रविवार (ता.२६) या दोन दिवशी मुख्यमंत्री धुळे आणि हिंगोली जिल्ह्याच्या पाहणी दौरावर जाणार आहेत. शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहणी करणार असल्याने शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे.

मागील दोन आठवड्यात वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाचा घास हिसकवला. रब्बीतील गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, फळपिके तसेच भाजीपालाचे नुकसान झाले.

मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात वादळी पावसाचा फटका अधिक बसला आहे. सध्या कृषिमंत्री सत्तार राज्याच्या विविध भागात पाहणी करत आहेत. आता मुख्यमंत्रीही पाहणी करणार आहेत.

सध्या सुरू असलेल्या राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी आग्रही मागणी विरोधी पक्षाने केली.

परंतु मुख्यमंत्र्यांनी पंचनाम्याचे आदेश दिल्याचे सांगून पंचनाम्यानंतर मदत जाहीर करू, असे सांगत शेतकऱ्यांची बोळवण केली, अशी नाराजी शेतकरी व्यक्त करत आहेत.

"२५ मार्चपर्यंत पंचनामे पूर्ण होतील. त्यानंतर सरकार मदतीचा निर्णय घेईल," असे कृषिमंत्री सत्तारांनी सांगितले. ते उत्तर महाराष्ट्राच्या पाहणी दौरावर होते.

दरम्यान, राज्य अर्थसंकल्प अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शेतकरी प्रश्नावर विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे. २५ मार्च रोजी राज्य अर्थसंकल्प अधिवेशन संपणार आहे.

निसर्गाच्या फेऱ्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार तातडीने मदत करेल की, पुनः शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जाणार, याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

Gokrupa Amrut Production: जालना जिल्ह्यात २ लाख ५८ हजार लिटर ‘गोकृपा अमृत’ निर्मिती

American Armyworm: ३ उपायांनी करा मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रण

Chilli Crop Management: मिरची पिकात वाढवर्धकांचा अनावश्यक वापर टाळा : डॉ. संजय पाटील

Sheep Grazing Permission: मेंढपाळांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, २१ वन विभागांमध्ये मेंढी चराईसाठी परवानगी

SCROLL FOR NEXT