CM Fadanvis  Agrowon
ॲग्रो विशेष

Ladaki Bahin Yojana : अधिवेशन संपताच लाडक्या बहिणीचा हप्ता जमा करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती

Ladaki Bahin Scheme : लाडकी बहिण या योजनेला कुठलाही नवीन निकष लावणार नाही. अधिवेशन संपताच लाडक्या बहिणीचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करणार आहोत, असं फडणवीस म्हणाले.

Dhananjay Sanap

Mahayuti Government : लाडकी बहिण योजनेचा डिसेंबरचा हप्ता अधिवेशन संपताच महिलांच्या खात्यावर जमा करणार आहोत, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता.१९) विधानसभेत दिली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. सध्या विधीमंडळाचं नागपूर हिवाळी अधिवेशन सुरू आहे. १६ डिसेंबर रोजी सुरू झालेलं अधिवेशन २१ डिसेंबर रोजी संपणार आहे. त्यानंतर महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहे.

फडणवीस म्हणाले, "जी आश्वासन दिली, ज्या योजना सुरू केल्या, त्यातील आश्वासन पूर्ण करू. कोणतीही योजना बंद करणार नाही. लाडकी बहिण या योजनेला कुठलाही नवीन निकष लावणार नाही. अधिवेशन संपताच लाडक्या बहिणीचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करणार आहोत," असं फडणवीस म्हणाले.

लाडकी बहिण योजनेतून राज्यातील २ कोटीहून अधिक महिलांना लाभ दिला गेला. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारने नोव्हेंबरमधील हप्ताही महिलांच्या खात्यावर जमा केला होता. आता डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार, याबद्दल महिला प्रतीक्षेत आहे. 

या योजनेला निवडणुकीनंतर निकष लावले जातील, अशी अंदाज बांधले जात होते. तसेच विरोधकांनी देखील टिका केली होती. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेच्या दरम्यान महायुती सरकारने दिलेली आश्वासन कधी पूर्ण करणार, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला. राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केली. सरकार कोणतीही योजना बंद करणार नाही, तसेच निकष लावणार नाही, असंही फडणवीसांनी सांगितलं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Import Duty: कापूस आयातीवरील ११ टक्के शुल्क काढले

Karnataka CM News: कर्नाटक काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेतेपदी डी. के. शिवकुमार, नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहुर्त ठरला

Land Acquisition Dispute: रिंग रोड भूसंपादनासंदर्भात शेतकऱ्यांचा संताप

Banana Crop Management: केळी व्यवस्थापन, खरीप पूर्वतयारीवर आज चर्चासत्र

Chandrapur Water Scarcity: पाणीटंचाईच्या झळांनी चंद्रपूरची होरपळ

SCROLL FOR NEXT