Chicken Festival Agrowon
ॲग्रो विशेष

Chicken Festival : पशुवैद्यक, पशुविज्ञान महाविद्यालयात ‘चिकन महोत्सव’

कुक्कुटपालन प्रक्षेत्रावर आयोजित या महोत्सवाचे उद्दिष्ट योग्य वाढ झालेल्या चिकनचा आहारात वापर करण्याबाबत जनजागृती करणे हा होता.

Team Agrowon

Akola Chicken Festival News : दैनंदिन आहारात पोषण (Daily Diet) मूल्य घटकांचा समावेश असणे आवश्यक आहे. त्यातूनच शरीराला आवश्यक ऊर्जा, पोषण (Nutrition) मिळते. शिवाय रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होऊन शरीराला योग्य फायदा होतो, असे मत येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. धनंजय दिघे यांनी केले.

कुक्कुटपालन शास्त्र विभागाच्या वतीने आयोजित चिकन महोत्सवात ते बोलत होते. कुक्कुटपालन प्रक्षेत्रावर आयोजित या महोत्सवाचे उद्दिष्ट योग्य वाढ झालेल्या चिकनचा आहारात वापर करण्याबाबत जनजागृती करणे हा होता.

या वेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, कुक्कुटपालन शास्त्र विभागप्रमुख डॉ. सतीश मनवर, डॉ. सुनील वाघमारे, डॉ. प्रशांत कपले, डॉ. मंगेश वाडे, डॉ. सुनील हजारे, डॉ. डी. एम. बदुकले, डॉ. मंगेश इंगवले, डॉ. रणजित इंगोले आदी उपस्थित होते.

डॉ. दिघे म्हणाले, ‘‘पक्षाच्या मांसातून मिळणारे पोषणमूल्य, सूक्ष्मद्रव्ये, प्रथिने, अमिनो आम्ले, चव इत्यादी घटकांबाबत विचार करून त्यानुसार योग्य कालावधीत ते आहारात समाविष्ट केले पाहिजेत. त्यासाठी चिकनचे मांस हे तीस दिवसांपर्यंतच्या कालावधीत आहारात समाविष्ट झाले पाहिजे.’’

डॉ. पवार यांनी आहार जनजागृतीवर भर द्यावा असे आवाहन केले. डॉ. मनवर यांनी चिकन महोत्सवाची भूमिका स्पष्ट केली. सूत्रसंचालन डॉ. मंगेश वड्डे यांनी केले. डॉ. प्रशांत कपले यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Protest : तात्काळ मदतीची मागणी! दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांचे उद्यापासून बेमुदत उपोषण

Soybean Seed Storage : सोयाबीन बियाणे सुरक्षित ठेवण्यासाठी कृषी तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला

Turmeric Crops : हळद उत्पादक शेतकरी हवालदिल! करप्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे हळद पीक आले अडचणीत

Amravati Teachers Constituency : अमरावती शिक्षक निवडणूक: शिक्षकांच्या मतांवर कोणाचा ताबा? मतविभाजन ठरणार निर्णायक

FFS App Fertilizer Booking : खत खरेदी आता झाली डिजिटल; २२ तारखेपासून घरबसल्या करा ऑनलाईन बुकिंग

SCROLL FOR NEXT