Jalna OBC Sabha Agrowon
ॲग्रो विशेष

Jalna OBC Sabha : ओबीसी एल्गार सभेत छगन भुजबळ कडाडले ; मनोज जरांगेवर हल्ला

Jalna Ambad sabha : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण न देण्याच्या मागणीसाठी आज जालन्यातील अंबडमध्ये ओबीसी एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार, माजी मंत्री महादेव जानकर, उपस्थित होते.

Swapnil Shinde

OBC Reservation : मनोज जरांगे-पाटील यांनी सरसकट मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये आरक्षण बचाव एल्गार सभा झाली. या सभेत अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर हल्ला चढवला.

सभेत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर टिका केली. मराठा तरुणांना मला सांगायचे आहे, या दगडाला शेंदूर लावून कोणता देव करायच आहे? त्याला आरक्षण कळेना, आरक्षण गरिबी हटावचा कार्यक्रम नाही.

ओबीसीमध्ये २९४ जातींचा समावेश हा सर्वोच्च न्यायालयाच्या शिक्क्याने केला. आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही. पण ज्या पद्धतीने मला रोज धमक्या येतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना शिव्या दिल्या जातायत. सर्व लोकप्रतिनिधींना गावबंदी केली जातेय. अख्खा महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर लिहिलाय का? सरकार आणि कायदा आहे की नाही, असा सवाल भुजबळ यांनी केला.

या सभेसाठी राज्यभरातून लाखो ओबीसी समाज बांधव अंबड शहरात दाखल झाले आहेत. या सभेसाठी सत्ताधारी आणि विरोध पक्षातील ओबीसी नेते एकाच मंचावर आल्याने या सभेकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. सभेच्या ठिकाणी 'आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं', जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा.. एकच पर्व ओबीसी सर्व अशा घोषणा दिल्या जात आहेत. या सभेला विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार गोपिचंद पडळकर, माजी खासदार विकास महात्मे व ओबीसी नेते उपस्थित होते.

ओबीसी समाजाच्या प्रमुख मागण्या...

  • मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करु नये

  • बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी

  • मराठा समाजाला दिलेली खोटी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करावी

  • खोटी बिंदू नामावली तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी

  • 7 सप्टेंबर 2023 रोजीचा कुणबी प्रमाणपत्रे देण्याचा जीआर रद्द करावा

  • बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करुन दाखल्यांचं वाटप करावं

  • धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT